

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील महामार्गावर इंडियन व . व . - ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ईव्ही चार्जिंग स्टेशन, चेंजिग रूम, सार्वजनिक शौचालये आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये बॅटरी स्वॅपिंग स्टेशनही उभारणार आहे.
EV charging stations Goa
त्यासाठी सरकारतर्फे जमीन उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. नियोजन आणि सांख्यिकी खात्यासह आयओसीएलने सामंजस्य करार केला. यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर सुरेशकुमार सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, आयओसीएल राज्याच्या विकसित भारत विकसित गोवा या अभियानात भाग घेत असून राज्यात ऊर्जा क्षेत्रातील साधन सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घेत आहे.
प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गांवर चार ठिकाणी सीएनजी आणि ऑइल स्टेशन, ईव्ही वाहन चार्जिंग स्टेशन उभे केले जातील. यात पत्रादेवी, मोले, केरी, पोळे या ठिकाणांचा समावेश आहे. याच ठिकाणी चेंजिंग रूम आणि शौचालयेही उभारली जातील. याबरोबरच म्हापसा, मडगाव, पणजी या ठिकाणी चार्जिंग स्टेशनही उभारले जातील.