Zuari Bridge Observatory | झुआरी पुलावरील वेधशाळा प्रकल्पाला पर्यावरण खात्यासह सीआरझेडची मंजुरी

Zuari Bridge Observatory | 127 मीटर उंच टॉवरसह व्ह्यूइंग गॅलरी : पर्यटकांसाठी बनणार आकर्षण
Zuari Bridge Observatory
Zuari Bridge Observatory
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील पणजी-मडगाव मार्गावरील नवीन झुआरी पुलाच्या परिसरात प्रस्तावित १२७ मीटर उंच झुआरी वेधशाळा टॉवर्स आणि व्ह्यूइंग गॅलरीज प्रकल्पाला गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने (जीएसईआयएए) पर्यावरण तसेच सीआरझेड मंजुरी दिली आहे.

Zuari Bridge Observatory
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

या प्रकल्पांतर्गत झुआरी पुलाच्या परिसरात पर्यटकांसाठी निरीक्षण सुविधा, व्ह्यूइंग गॅलरी, मनोरंजनाची ठिकाणे आणि विविध पर्यटक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा परिसर गोव्यातील महत्त्वाचे पर्यटन आकर्षण म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे.


राज्य तज्ज्ञ मूल्यांकन समितीने २९३ व्या बैठकीत प्रकल्पाला पर्यावरण व सीआरझेड मंजुरी देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर जीएसईआयएएच्या १९९ व्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पासाठी दररोज सुमारे १०७ केएलडी पाण्याची गरज भासणार असून, सुमारे २ हजार ४०० किलो घनकचरा निर्माण होण्याचा अंदाज आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी ७५ घनमीटर क्षमतेची पर्जन्यजल संचयन टाकी उभारण्याचेही प्रस्तावित आहे.

दररोज ६८ केएलडी सांडपाणी

प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दररोज सुमारे ६८ केएलडी (किलो लिटर प्रतिदिन) सांडपाणी निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ७० केएलडी क्षमतेचा मेंब्रेन बायोरिॲक्टर (एमबीआर) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

विविध सुविधांचा समावेश

प्रस्तावित प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्र ४१ हजार ६७४ चौरस मीटर असून, त्यात १२७ मीटर उंचीचा आरसीसी शाफ्ट/टॉवर उभारण्यात येणार आहे. प्रकल्पात वेधशाळा टॉवर, व्ह्यूइंग गॅलरी, प्रवेश पूल, सजावटीची रोषणाई, पार्किंग, मनोरंजन क्षेत्र, लँडस्केपिंग, कॅफेटेरिया, पर्यटक सुविधा आणि विविध उपयुक्तता सेवांचा समावेश आहे. याशिवाय तरंगते पॉन्टून आणि ड्रेजिंगचीही तरतूद करण्यात आली आहे. पार्किंगसाठी १२८ चारचाकी आणि २५० दुचाकी वाहनांची क्षमता प्रस्तावित आहे.

Zuari Bridge Observatory
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

शून्य-विसर्जन प्रणाली अनिवार्य

पर्यावरणीय मंजुरी देताना प्राधिकरणाने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. प्रकल्पात शून्य-विसर्जन प्रणाली कार्यान्वित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी फ्लशिंग, बागकाम आणि अन्य योग्य कारणांसाठी पुनर्वापरावे लागणार आहे.

पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी एलओटी आधारित देखरेख प्रणाली, इलेक्ट्रॉनिक फ्लो मीटर्स आणि अल्ट्राफिल्ट्रेशन प्रणाली बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या उपाययोजनांच्या माध्यमातून प्रकल्पामुळे होणारा पर्यावरणीय परिणाम नियंत्रित ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news