Goa Assembly Election | गोवा विधानसभा निवडणुकीचे वेध! 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाचे उच्चस्तरीय पथक गोव्यात दाखल होणार

Goa Assembly Election | विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा
Goa Assembly Election
Goa Assembly Election Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : भारतीय निवडणूक आयोगाचे उच्चस्तरीय पथक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी गोव्यात येत आहे. वरिष्ठ निवडणूक उपायुक्त मनीष गर्ग आणि पवन कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे पथक गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे.

Goa Assembly Election
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

हे पथक ७ व ८ असे दोन दिवस गोव्यात असेल. दि. ७ रोजी पथक गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकारी, राज्य पोलिस नोडल अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलिस अधीक्षक आणि अंमलबजावणी यंत्रणांसोबत विशेष बैठका घेणार आहेत.

या पथकात आशिष गोयल, शुभ्रा सक्सेना, बिद्याराणी कोन्थौजम, प्रधान सचिव अजय कुमार, सचिव विनोद कुमार आणि अवर सचिव एम. एल. मीना यांचाही समावेश असेल. ८ ऑक्टोबर रोजी दोन्ही जिल्ह्यांतील निवडणूक अधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याद्वारे स्वतंत्र सादरीकरण केले जाईल.

यानंतर वरिष्ठ निवडणूक उपायुक्त मनीष गर्ग आणि पवन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाने या सत्राची सांगता होणार आहे. गोव्याच्या संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी त्रिवेणी वेळीप यांनी दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश जारी केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news