

फोंडा : सिल्वानगर-फोंडा येथील अंतर्गत रस्त्यावर सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास कार व सायकलच्या जोरदार धडकेत सायकलवरील आठ वर्षीय मुलगी ठार झाली. मुलीचे नाव उमी हनी अन्सारी असे असून ती आपल्या कुटुंबासमवेत सिल्वानगर येथे राहत होती.
सकाळी कारचालक महेंद्र दत्ता कासकर (वय 48) मूळ ओडकरवाडा-साकोर्डा येथील, पण सध्या सिल्वानगर-फोंडा येथे राहणारा. जीए 12 ए 0787 या क्रमांकाच्या कारने सिल्वानगरहून फोंड्याच्या दिशेने येत होते. समोरून सायकलवरून येणार्या उमी अन्सारी हिला कारने जोरदार धडक दिली. अपघातात उमी अन्सारी उसळून रस्त्यावर फेकली गेली, त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती जागीच ठार झाली. अपघातानंतर उमीला त्वरित फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मयत उमी अन्सारी ही मुलगी फोंड्यातील एका विद्यालयात दुसरीच्या वर्गात शिकत होती. दिवाळीची सुटी असल्याने ती सायकलवरून फेर्या मारत होती. अपघातग्रस्त कार चालक महेंद्र कासकर स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.