Digital Arrest Cyber Fraud Goa | गोठवलेल्या रकमेच्या मुक्ततेसाठी 'एसओपी'चे पालन बंधनकारक

Digital Arrest Cyber Fraud Goa | गोव्यासह देशातील २० ठिकाणी ईडीचे छापे; रोकड, परकीय चलन आणि सोन्यासह करोडोंची मालमत्ता जप्त
Digital Arrest Cyber Fraud
Digital Arrest Cyber FraudPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

एका ज्येष्ठ नागरिकाची २.६ कोटी रुपयांची 'डिजिटल अटक' करून फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत गोवा, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथील २० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले तसेच सुमारे १४ कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली.

Digital Arrest Cyber Fraud
Thane Crime : बनावट बँक खाती उघडून ऑनलाईन फ्रॉड करणारी मोठी टोळी गजाआड

या कारवाईदरम्यान ईडीने ८० लाख रुपये रोख, १.२४ कोटी रुपयांचे परकीय चलन, १.३० कोटी रुपयांचे सोने तसेच सुमारे १४ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.

या गैरव्यवहारातून मिळालेला पैसा वळवण्यासाठी वापरल्या गेल्याचा संशय असलेली ४०० हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तसेच, मनी लाँड्रिंगसाठी वापरल्या गेल्याचा संशय असलेल्या शेल कंपन्यांचे सुमारे १०० रबर स्टँपही ईडीच्या हाती लागले आहेत.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ही मनी लाँड्रिंग चौकशी गोव्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची २.६ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याच्या प्रकरणावर आधारित आहे. या प्रकरणात आरोपींनी स्वतःला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून पीडिताशी संपर्क साधला. फोन कॉल आणि व्हॉट्सॲप संदेशांच्या माध्यमातून पीडिताला त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू असल्याचे खोटे सांगण्यात आले.

Digital Arrest Cyber Fraud
Investock scam : पॉजी स्कीमच्या नावाखाली ३० कोटींचा गंडा

त्यानंतर 'डिजिटल अटक' होणार असल्याची भीती दाखवून त्याच्याकडून मोठी रक्कम आरोपींच्या नियंत्रणाखालील विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेण्यात आली. या प्रकरणात फसवणुकीतून मिळालेल्या पैशांचा प्रवाह, तो लपवण्यासाठी वापरण्यात आलेल्या शेल कंपन्यांचे जाळे आणि बनावट बँक खाती चालवणाऱ्या संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news