

पणजी : रायबंदर-चोडण जलमार्गावर 14 जुलैपासून दोन रो-रो फेरीबोटी सुरू होणार आहेत. या फेरीबोटींचे लोकार्पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सकाळी 11 वा. होणार असल्याची माहिती नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.
मंत्री फळदेसाई म्हणाले, एक रो-रो फेरीबोटीची वहन क्षमता 15 चारचाकी, 40 दुचाकी व 100 प्रवासी एवढी आहे. रायबंदर ते चोडण मांडवी नदीतील अंतर पार करण्यासाठी या रो-रो फेरीबोटींना 7 ते 8 मिनिटे लागतील.
मंत्री फळदेसाई यांनी शनिवारी रायबंदर फेरी धक्क्यावर रायबंदर ते चोडण फेरीसेवेची पाहणी केली. मंत्री फळदेसाई म्हणाले, गंगोत्री व द्वारका अशी फेरीबोटींची नावे आहेत. एका महिन्यानंतर रो-रो फेरीसेवेचा आढावा घेऊ आणि इतर ठिकाणीही अशाच सेवा देण्यावर विचार करू, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.