Drumskin Movie | सूड घ्यायचा की प्रेमात पडायचे? 'ड्रमस्किन' चित्रपटातील अनपेक्षित वळणांनी प्रेक्षक थक्क!

Drumskin Movie | अर्जेंटिनाची चित्रपटसृष्टी थरारपट आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखली जाते.
Drumskin Movie | सूड घ्यायचा की प्रेमात पडायचे? 'ड्रमस्किन' चित्रपटातील अनपेक्षित वळणांनी प्रेक्षक थक्क!
Published on: 
Updated on: 

पणजी : दीपक जाधव
अर्जेंटिनाची चित्रपटसृष्टी थरारपट आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही अशा चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो. 'ड्रमस्किन' हा त्याच परंपरेतील नवा चित्रपट आहे. जोआक्विन कॅम्ब्रे दिग्दर्शित 'ड्रमस्किन' चित्रपटाचे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिनेमा ऑफ द वर्ल्ड या श्रेणीत प्रदर्शित करण्यात आले.

Drumskin Movie | सूड घ्यायचा की प्रेमात पडायचे? 'ड्रमस्किन' चित्रपटातील अनपेक्षित वळणांनी प्रेक्षक थक्क!
Iffi Goa| सप्तरंगी इफ्फीचे पणजी कायमचे माहेरघर

चित्रपटाच्या कथानकाची मूळ कल्पना फारशी नावीन्यपूर्ण नसली, तरी त्याची अनपेक्षित वळणे आणि प्रभावी मांडणीने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.
जस्टिना बुस्टोस हिने मिलेनाची भूमिका साकारली आहे. तिशीतील मिलेनाचे आयुष्य एका अपघातामुळे पूर्णपणे बदललेले असते.

मोटार अपघातानंतर तिचा पती कायमस्वरूपी वनस्पतिसदृश अवस्थेत गेला आहे. या अपघाताला कारणीभूत असलेला टॉम (डॉनियल एलियास) अवघ्या दोन वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला आहे.

अपराधीपणाच्या भावनेने ग्रासलेला टॉम मद्यपान सोडण्यासाठीच्या 'एए' बैठकांना उपस्थित राहू लागतो. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यामुळे घडलेल्या दुर्घटनेची भरपाई करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मिलेनाही बनावट नावाने त्याच बैठकांना जाऊ लागते. दोघांच्या भेटींच्या या प्रवासातून सूड, आकर्षण आणि मानसिक संघर्षाची गुंतागुंतीची कहाणी उलगडते. या बैठका ज्या इमारतीत होतात, त्याच ठिकाणी मालाम्बो नृत्याचा सरावही सुरू असतो.

त्यातील ढोलांचा ठेका हळूहळू मिलेनाच्या मनावर परिणाम करू लागतो. सूड घेण्याची इच्छा आणि शारीरिक आकर्षण यांच्यात ती अडकते. ज्या व्यक्तीबद्दल तिला मनापासून तिरस्कार वाटायला हवा, त्याच व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने तिचा अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र होतो, ही स्थिती अत्यंत सुबकरित्या मांडण्यात आली आहे.

Drumskin Movie | सूड घ्यायचा की प्रेमात पडायचे? 'ड्रमस्किन' चित्रपटातील अनपेक्षित वळणांनी प्रेक्षक थक्क!
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

मानवी मनातील विरोधाभासांचा वेध...

मालाम्बोच्या तालावर पुढे सरकणारी ही कथा सूड आणि इच्छांमधील संघर्षातून मानवी मनातील विरोधाभासांचा वेध घेते. प्रत्येक पात्राची इच्छा वेगळी असली, तरी त्यांच्या नात्यांमध्ये एक अनोखा ताळमेळ जाणवतो. विशेषतः चित्रपटाची अखेरीची दृश्ये अत्यंत संयत आणि प्रभावी आहेत. त्यामुळे 'ड्रमस्किन' हा पारंपरिक सूडकथेपेक्षा वेगळा, अस्वस्थ करणारा आणि विचार करायला लावणारा चित्रपट ठरतो.

दिग्दर्शक कॅम्ब्रे आणि छायाचित्रकार पाब्लो बर्नस्ट यांनी मद्याला अपराधीपणाचे प्रतीक बनवले आहे. रात्रीच्या अंधाऱ्या रस्त्यांवर उलगडणारा पाठलाग आणि बदलती नाती कथेला वेगळी दिशा देतात. चित्रपटात प्रणय आणि रहस्य यांचा मेळ आहे; मात्र दोघांमधील नात्याची नैतिक गुंतागुंत त्याला अस्वस्थ करणारी किनार देते. साधारण अर्धा चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षक कोणाच्या बाजूने उभे राहावे, असा प्रश्न निर्माण होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.