Goa News| अकरा पालिकांचा प्रभाग फेररचना मसुदा जाहीर

अधिसूचना जारी : हरकती, सूचनांसाठी ३० दिवसांची मुदत
Panjim Municipal Corporation
Panjim Municipal Corporation
Published on
Updated on

पणजी : गोवा राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ११ नगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागांच्या (वॉर्ड) सीमांकनाचा फेररचनेचा मसुदा जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी गोवा नगरपालिका कायदा, १९६८ च्या कलम १०(३) अंतर्गत ही अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत लेखी हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

या मसुद्यानुसार मुरगाव, मडगाव, म्हापसा, कुडचडे - काकोडा, डिचोली, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, वाळपई, पेडणे आणि सांगे या ११ नगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागांची फेररचना प्रस्तावित करण्यात आली आहे. या मसुद्यावर नागरिक, राजकीय पक्ष आणि संबंधित हितधारकांकडून लेखी हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्या पणजी-आल्तिन्हो येथील गोवा राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सादर करता येतील.

सध्या राज्यातील सर्व नगरपालिकांवर सरकारने प्रशासकांची नेमणूक केली आहे. या सर्व नगरपालिकांच्या मंडळाची मुदत मे महिन्यात संपल्याने, तसेच मुदत संपण्यापूर्वी कायद्यानुसार निवडणूक झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासकांची नेमणूक केली गेली आहे. काही नगरपालिकांमध्ये प्रभाग वाढण्याची शक्यता असल्याने प्रभागवार समान मतदारांची संख्या करण्यासाठी ही फेररचना करण्यात आली आहे.

हरकती व सूचनांनंतर अंतिम मसुदा

राज्यातील या ११ नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यापूर्वी प्रभाग फेररचना आणि आरक्षण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून, त्यासाठी हा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. हरकती व सूचनांचा विचार केल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news