

वास्को : गोव्याचे खाद्यपदार्थ आणि हातकामातून निर्माण झालेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. महिलांना अशा उपक्रमांमधून प्रोत्साहन दिल्यास त्या सक्षम होतील, असा विश्वास कला व संस्कृतीमंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, रवींद्र भवन येथे रवींद्र भवन आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारत आणि महिला शक्ती अभियान अंतर्गत दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी तवडकर बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी कल्याण, क्रीडा, कला आणि संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा अनिता थोरात आणि रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव उपस्थित होते. दिवाळी बाजारात विविध हस्तकला वस्तू, स्थानिक खाद्यपदार्थ, आणि महिलांच्या स्वयंसहायता गटांच्या निर्मितींचे आकर्षक स्टॉल्स लावण्यात आले होते. नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.