बडतर्फ पोलिस कर्मचारी 8.98 लाखांच्या ड्रग्जसह अटक

एएनसी पथकाने वागातोर, हरमल येथे टाकला छापा
dismissed police officer arrested with drugs
बडतर्फ पोलिस कर्मचारी 8.98 लाखांच्या ड्रग्जसह अटकFile Photo
Published on
Updated on

पणजी : गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) गोपनीय माहितीच्या आधारे वागातोर आणि हरमल येथे छापा टाकला. वागातोर येथील युवकाला 8.98 लाखांच्या ड्रग्जसह अटक करण्यात आली. हा युवक ड्रग्जची विक्री करण्यासाठी आला असता पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्याच्याकडे कोकेन, मेथाम्फेटामाइन आणि एक्स्टसीसारखे अमली पदार्थ आढळून आले. यानंतर त्यास ताब्यात घेत योग्य कलामांन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. करण गोवेकर (33, हणजुण) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

संशयित करण हा बडतर्फ प्रशिक्षणार्थी पोलिस आहे. प्रशिक्षणावेळी त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्यामुळे त्याला बडतर्फ करण्यात आले होते. त्याच्याकडून 37 ग्राम कोकेन, 37 ग्राम मेथाम्फेटामाइन आणि 15 ग्रॅम उच्च दर्जाच्या एक्स्टसी टॅबलेट्स असा माल जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जची आंतराष्ट्रीय बाजारात 8.98 लाख रुपये इतकी किंमत आहे. या पथकाने ड्रग्जची वाहतूक करण्यासाठी संशयिताने वापरलेली कार देखील जप्त केली आहे.

दुसर्‍या प्रकरणात हरमल येथे एका युवकाला अटक करीत त्याच्याकडून 2 लाखांचा 200 ग्रॅम चरस जप्त केला. एएनसी पथकाने शुक्रवारी 21 मार्च रोजी पहाटे अटक केलेल्या युवकाचे नाव बेस्ताव रॉड्रिग्ज (28 वर्षे, हरमल) असे आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीनदयाल रेडकर करत आहेत. एएनसीचे अधीक्षक टिकम सिंह वर्मा, उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक संजीथ पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news