Kadamba Transport Corporation | डिझेल दरवाढीचा कदंब बस सेवेला फटका; दरमहा 70 लाखांचा अतिरिक्त इंधन खर्च

Kadamba Transport Corporation | महामंडळ दरमहा सुमारे 4.5 लाख लिटर डिझेल वापरते, दैनंदिन वापर सरासरी 15,000 लिटर असतो.
Kadamba bus
Kadamba bus
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात प्रतिलिटर ११ रुपयांची वाढ झाल्याने कदंब परिवहन महामंडळाला (केटीसी) दरमहा ७० लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च इंधनावर करावा लागत आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली.
ते म्हणाले की, महामंडळाकडे सुमारे ६३० वाहनांचा ताफा असून, त्यापैकी ४६० डिझेलवर चालणाऱ्या बस आहेत. इंधन दरवाढीचा या वाहनांवर थेट परिणाम झाला.

Kadamba bus
Goa Road Accidents | गोव्यात अतिवेगाने गाड्या चालवण्याचे प्रमाण दुप्पट; 7 महिन्यांत तब्बल 23 हजारांहून अधिक गुन्हे दाखल

महामंडळ दरमहा सुमारे ४.५ लाख लिटर डिझेल वापरते, दैनंदिन वापर सरासरी १५,००० लिटर असतो. दरवाढीपूर्वी महामंडळाचा डिझेलवरील मासिक खर्च सुमारे ३.७ कोटी ते ३.८ कोटी रुपये होता. प्रतिलिटर ११ रुपयांच्या दरवाढीमुळे केटीसीच्या बससेवेच्या व्याप्तीमुळे त्यांचा मासिक खर्च वाढतो. तथापि, प्रवासी भाड्यात वाढ न झाल्याने प्रवाशांवर आर्थिक ताण येत नाही.

कदंबचे स्टीअरिंग येणार महिलांच्या हाती

तुयेकर म्हणाले की, महामंडळाने कर्मचारी वर्गात महिलांचा समावेश सुनिश्चित केला आहे. प्रवाशांना माहित आहे की, आम्ही एक महिला तिकीट संकलक नेमली आहे. यावर्षी भरती प्रक्रियेत एका महिला चालकाचीही निवड केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news