

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
वाठादेव डिचोली येथील रस्त्यावर कुडचिरेहून डिचोली येथे येणाऱ्या जीपला भल्या मोठ्या गव्या रेड्याची जबर धडक बसल्याने जीप काहीशी रस्त्याच्या बाजूला गेली. या धडकेत जीपचे मोठे नुकसान झाले. गवा रस्ता ओलांडून जात असताना येणाऱ्या वाहनाला धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर गव्याने धूम ठोकली. जीपमध्ये चालक व येथील कंपनीत काम करणारा कुडचिरे येथील इसम होता. सुदैवाने दोघांनाही फारशी दुखापत झाली नाही. डिचोली पोलिस तसेच वन खात्याची टॉम घटनास्थळी दाखल झाली. या भागात अनेक ठिकाणी गवा रेड्यांचा मोठा वावर असून रस्त्यावरून क्रॉस करताना अनेक वेळा असे अपघात घडलेले आहेत. काही दिवसापूर्वी मये येथे असाच अपघात घडल्याने चार चाकी वाहनाचे नुकसान झाले होते तसेच एका दुचाकीची हानी होऊन चालक जखमी झाला होता. वन विभागाने या ठिकाणी पाहणी केली आहे.