Goa Night Club
Goa Night Club

Goa News | 'डायझ क्लब'ला व्यवसाय बंद ठेवण्याची पंचायतीची नोटीस

मालकाला २० रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश
Published on

पणजी : पुढारी वृत्तसेवा हणजूण - कायसूव पंचायतीने 'डायझ क्लब'ला कारणे दाखवा नोटीस बजावून त्यावरील प्रक्रिया पूर्ण होऊन निर्णय होईपर्यंत क्लबचे सर्व व्यावसायिक व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

या क्लबच्या मालकाला २० रोजी दुपारी ३.३० वा. ग्रामपंचायत कार्यालयात वैयक्तिक सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत २७ जानेवारी २०२६ रोजी मंजूर झालेल्या ठराव क्रमांक १२(१३३) नुसार ही नोटीस जारी केली. ही नोटीस मे. डायझ, पी अँड पी फूड कॉर्पोरेशनची युनिटचे मालक नितीन वाधवा यांच्या सर्वे क्रमांक ५०९/१, गौम वाडी, हणजूण - बार्देश गोवा यांना बजावली.

क्लबच्या मालकांना बजावलेल्या नोटीशीनुसार सुनावणीवेळी उपस्थित राहून लेखी उत्तरासह सर्व मूळ कागदपत्रे, परवाने व अनुमती सादर करणे बंधनकारक असल्याचे नोटीशीमध्ये नमूद आहे. अनुपस्थित राहिल्यास किंवा उत्तर न दिल्यास प्रकरणाचा निर्णय एकतर्फी घेण्यात येईल, असा इशाराही दिला. ही नोटीस हणजूण-कायसूव ग्रामपंचायतीचे सचिव यांनी जारी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news