Goa Traffic Diversion Dhargal | धारगळ येथे रात्रीची वाहतूक वळवणार

Goa Traffic Diversion Dhargal | उड्डाणपूल कामामुळे निर्णय; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अधिसूचना जारी
Goa Traffic Diversion Dhargal
Goa Traffic Diversion Dhargal
Published on: 
Updated on: 

पणजी (पुढारी वृत्तसेवा): धारगळ-पेडणे येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे राष्ट्रीय महामार्ग-६६ वर रात्रीच्या वेळी वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Goa Traffic Diversion Dhargal
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

धारगळ येथील कि.मी. ४९४.४१८ ते कि.मी. ४९४.५४८ दरम्यान पीएससी गर्डर लाँचिंगचे काम वेगाने आणि विनाअथळा पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कामादरम्यान, संबंधित मार्गावरील (कालोजी वाइन स्टोअर ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप दरम्यान) वाहतूक तात्पुरती वाढवलेल्या लेन आणि सर्व्हिस रोडवर वळवण्यात येणार आहे. हा वाहतूक बदल २० डिसेंबर २०२६ या कालावधीत लागू राहील. वाहनचालकांसाठी हा नियम रात्री १०:३० ते सकाळी ६ या वेळेत लागू असेल.

सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना

वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आणि सुलभ प्रवासासाठी कंत्राटदार संस्थेद्वारे रात्रीच्या वेळी बॅरिकेट्स, ब्लिंकर्स आणि ट्रॅफिक मार्शलची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच आयआरसी आणि मोर्ल च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोकणी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत माहिती दर्शवणारे फलक लावले जाणार असून, वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी रम्बलर स्ट्रिप्स आणि रोड मार्किंग स्टड्स बसवले जाणार आहेत.

Goa Traffic Diversion Dhargal
Panaji shopkeepers fire safety demand|पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका

नियमांचे काटेकोर पालन करा

संबंधित यंत्रणेने ठरवून दिलेला वाहतूक वळण आराखडा आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता (राष्ट्रीय महामार्ग विभाग पणजी-गोवा) गजानन आर. देसाई यांनी दिले आहेत. दरम्यान, याची नोंद घेण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.