.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पणजी : गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या दिल्लीतील पर्यटकाचा कळंगुट किनाऱ्यावर (Calangute Beach) लुटमारीच्या उद्देशाने चाकूने भोसकून खून केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. हर्ष तन्वर (वय २५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
दिल्लीतील पर्यटक हर्ष तन्वर हा शुक्रवारी गोव्यात आला होता. शुक्रवारी रात्री तो कळंगुट किनाऱ्यावर बसला असता तिथे आलेल्या तिघांनी त्याच्याशी वाद घालत बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तन्वरचा मृत्यू झाल्याचे समजताच तिघेही संशयित तिथून पसार झाले. शनिवारी हर्ष याचा मृतदेह समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. सोमवारी शवविच्छेदन अहवालत त्याचा मृत्यू धारदार शस्त्राने वार केल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिक तपास करत कळंगुट किनाऱ्यावर असणारे साहिल कुमार भटसागर (रा. म्हाड्डोवाडा कळंगुट मूळ रा. उत्तराखंड), नूर मोहम्मद खान ( रा. पर्रा ) व सुनील विश्वकर्मा (मूळ रा. नेपाळ) यांना सोमवारी रात्री उशिरा अटक केली. पोलिस निरीक्षक परेश नाईक अधिक तपास करीत आहेत.