Mavin Godinho | माविन गुदिन्हो यांना दाबोळीत स्वपक्षातूनच कडवे आव्हान

Mavin Godinho | कमलाप्रसाद यादव यांचे निवडणूक लढवण्याचे संकेत
Minister Mauvin Godinho
Minister Mauvin Godinho
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
दाबोळीत परप्रांतीयांच्या मतांवर निवडून येणारे आणि स्थानिक मतदारांना कसपटासमान लेखणारे माविन गुदिन्हो यांच्यासमोर आता त्यातीलच नेतृत्वाकडून राजकीय आव्हान उभे राहिले आहे. त्यांचे खंदे समर्थक व चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी दाबोळीतून त्यांच्याविरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

Minister Mauvin Godinho
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

गुदिन्हो यांच्याविरोधातील पक्ष आणि मतदारसंघातील नाराजी पाहता त्यांना उमेदवारीही नाकारली जाऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. यादव यांनी दाबोळी मतदारसंघात स्वतःचे क्रिकेट स्टेडियम उभारल्यानंतर ते बरेच चर्चेत आले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, आपण विधानसभा निवडणूक लढवावी, यासाठी लोकांचा दबाव वाढत आहे.

गुदिन्हो पूर्वी काँग्रेसमध्ये होते. दाबोळी मतदारसंघ अस्तित्वात नव्हता, तेव्हा ते कुडठीतून निवडून यायचे. दाबोळी मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर ते या मतदारसंघातून लढू लागले. मात्र, आता त्यांचेच खंदे समर्थक कमलाप्रसाद यादव यांनाही आपण आमदार व्हावे, असे वाटू लागले आहे.

Minister Mauvin Godinho
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

दाबोळी मतदारसंघात येणाऱ्या भोगमाळोचे काही माजी सरपंच, पंच तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते, गुदिन्हो यांच्यावर नाराज झालेले भाजपचे कार्यकर्ते यादव यांच्या सोबत मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. दाबोळी मतदारसंघातील गुदिन्हो यांच्या अपयशाचा पाढाच ते मतदारांसमोर वाचत आहेत. पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक; अन्यथा समर्थक जे सांगतील, त्यानुसार आपण पुढे जाणार आहे, अशी प्रतिक्रिया यादव यांनी दिली आहे.

मला कुणाची चिंता नाही : गुदिन्हो

कुणीही निवडणूक लढवली तरी आपणास चिंता नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याची मोकळीक आहे. आपण दाबोळी मतदारसंघाचा भरीव विकास केला आहे. त्यामुळे दाबोळीचे मतदार आपल्या सोबत आहेत, अशी प्रतिक्रिया गुदिन्हो यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news