Nargao Cyclonic Storm | नगरगावसह नानेली, शिंगणे आणि शेळप परिसरात चक्रीवादळाचा जोरदार तडाखा; शेतीचे अतोनात नुकसान

Nargao Cyclonic Storm | विजांच्या कडकडाटात मुसळधार : केळी, काजू बागायती, सुपारी, नारळाच्या बागांचे नुकसान
Cyclonic Storm
Cyclonic Storm
Published on: 
Updated on: 

धावे : पुढारी वृत्तसेवा
नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील नानेली, शिंगणे, शेळप, नगरगावला सोमवारी संध्याकाळी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये शेतकरी वर्गचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळपासूनच दमट हवामान होते. परंतु दुपारी थोडेसे आकाश निरभ्र झाले. परंतु संध्याकाळी चारच्या दरम्यान सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस सुरू झाला. नगरगाव, नानेली या भागाला याचा मोठा फटका बसला. यामध्ये केळी, काजू बागायती, सुपारी, नारळाच्या बागा यांचे मोठे नुकसान झाले.

Cyclonic Storm
Dnyaneshwar Maharaj Palkhi Ringan: धावे अश्व माउलींचा, उधळे भक्तीचा गंध; चांदोबाचा लिंबमध्ये उभे रिंगण

यामध्ये वीजवाहिन्यांवर ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे वीज खात्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दल त्याचबरोबर वीज खात्याचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामांमध्ये गुंतलेले होते.

शिणगुण येथील दत्तगुरू वझे यांच्या फार्म शेडचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. छपराचे पत्रे उडून गेल्यामुळे त्यामध्ये राहत असलेल्या कामगार वर्गाचे मोठे हाल झाले. नगरगाव येथे वीजवाहिन्यांवर माडांचे झाड पडून वीज पुरवठा खंडित झाला.

या ठिकाणी वीजवाहिन्या तुटून खाली पडलेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत वीज खात्याचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते. शेळप या ठिकाणी घराच्या मागील बाजूला झाड पडून काही प्रमाणात नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या फांद्या काढण्यात व्यस्त होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.