Labor Verification Cuncolim | प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल व्यापारी संघटनेकडून नाराजी व्यक्त

Labor Verification Cuncolim | कुंकळ्ळीत रोजंदारी मजुरांसाठी नोंदणी केंद्राचा प्रस्ताव धूळखात
Labor Verification Cuncolim
Labor Verification Cuncolim
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
कुंकळ्ळीतील बाजार परिसरात दररोज सकाळी मोठ्या संख्येने जमणाऱ्या स्थलांतरित रोजंदारी मजुरांसाठी स्वतंत्र नोंदणी व सुविधा केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव कुंकळ्ळी व्यावसायिक संघटनेने दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आणि कुंकळ्ळी नगरपालिकेच्या प्रशासकांकडे सादर करून महिनाभर उलटला, तरी त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल व्यापारी संघटनेने नाराजी व्यक्त करून हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.

Labor Verification Cuncolim
Ganpati Special Trains 2026: गणपतीसाठी मडगाव व कुर्ला येथून विशेष गाड्या

कुंकळ्ळीतील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेजवळ दररोज सकाळी सुमारे ४०० ते ६०० स्थलांतरित रोजंदारी मजूर कामाच्या शोधात जमा होत असल्याचे ट्रेडर्स असोसिएशनने निवेदनात म्हटले आहे. सकाळच्या वेळी मोठ्या संख्येने मजूर एकाच ठिकाणी उभे राहत असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होतात.

पादचाऱ्यांची गैरसोय होते तसेच परिसरात असंघटित आणि गोंधळाचे वातावरण निर्माण होते. काम देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही आवश्यकतेनुसार योग्य मजूर शोधताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासन आणि कामगार यांच्यातील समन्वय प्रभावी होईल, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर कुंकळ्ळी नगरपालिकेच्या देखरेखीखाली स्वतंत्र सुविधा व नोंदणी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव संघटनेने दिला आहे. या केंद्रामार्फत रोजंदारी मजुरांची अधिकृत नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

नोंदणी प्रक्रियेत मजुरांचा मूळ पत्ता, आधार कार्डची प्रत, मोबाईल क्रमांक, गोव्यात ते ज्या घरमालक किंवा नियोक्त्याकडे वास्तव्यास आहेत त्यांची माहिती व संपर्क क्रमांक तसेच नगरपालिकेला आवश्यक वाटणारी इतर माहिती नोंदवण्याची सूचना करण्यात आली आहे.

या व्यवस्थेमुळे बाजार परिसरात येणाऱ्या मजुरांची ओळख व पडताळणी सुलभ होईल, अनधिकृत व्यक्तींची गर्दी कमी करण्यास मदत होईल आणि काम देणाऱ्या नागरिकांना नोंदणीकृत मजुरांची माहिती उपलब्ध होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. तसेच मजुरांच्या वास्तव्यासंदर्भातील जबाबदारी निश्चित करण्यास प्रशासनाला मदत होईल.

नोंदणी केंद्रामुळे रोजंदारी कामासाठी येणाऱ्या मजुरांना काम मिळण्याची प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध होण्याबरोबरच बाजार परिसरातील वाहतूक व सार्वजनिक वावर सुरळीत ठेवण्यासही मदत होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे.

Labor Verification Cuncolim
Government Health Centre | मडगाव-फातोर्डा आरोग्य केंद्रात औषध टंचाई

केंद्राच्या प्रशासकीय व देखभाल खर्चासाठी प्रत्येक नोंदणीकृत मजुराकडून दरमहा सुमारे ३०० रुपये नाममात्र शुल्क आकारण्याचा प्रस्ताव संघटनेने मांडला आहे. या शुल्कातून केंद्राचे व्यवस्थापन, नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा खर्च भागविता येईल, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

नोंदणी केंद्र त्वरित सुरू करा : तळावलीकर

कुंकळ्ळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष यतीन तळावलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै २०२६ रोजी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, कुंकळ्ळी नगरपालिकेचे प्रशासक आणि कुंकळ्ळी पोलिस स्थानकाला निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, आजतागायत प्रस्तावावर कोणताही निर्णय झालेला नाही किंवा अंमलबजावणीसाठी पुढील पावले उचलण्यात आलेली नाहीत. प्रशासनाने हे नोंदणी केंद्र त्वरित सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news