पणजी : केवळ नऊ चित्रपटांच्या प्रदर्शनाने सुरु झालेल्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमाचा हा अनन्य साधारण भाग आहे. इंडियन पॅनोरमा देशाची सांस्कृतिक विविधता आणि दृश्यात्मक साक्षरतेचा विकास प्रतिबिंबित करतो. चित्रपटप्रेंमी म्हणून हा प्रवास भारताचा सिनेमॅटिक परिप्रेक्ष आणि सामाजिक परिवर्तनाच्या अभ्यासाचा एक अमूल्य ठेवा आहे, असे प्रतिपादन इंडियन पॅनोरमा चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष डॉ. टी. एस. नागभरणा यांनी केले. IFFI Goa
54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. नागभरणा बोलत होते. IFFI Goa
ते म्हणाले की, संपूर्ण निवड समितीने 'सिनेमाची भाषा' आणि चित्रपटाचा आत्मा लक्षात घेऊन चित्रपटांचे काटेकोरपणे विश्लेषण केले. आमच्यातील प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. तरीही, सिनेमाचा गाभा, त्याची भाषा आणि सार याचे आकलन सर्वात महत्वाचे ठरते. आशय आणि कौशल्याचा मिलाफ महत्वाचा समजून आम्ही एकत्रितपणे जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपट निर्मिती हा समर्पित प्रवास असून त्यासाठी तयारी आणि अपार कष्टाची तयारी लागते. 'आरारीरारो' सारख्या चित्रपटांनी आज आपल्यासमोर एक नवीन दृष्टिकोन मांडला आहे. त्यामुळेच या चित्रपटाचे वेगळेपण उठून दिसते.
हेही वाचा