

पणजी : नववर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झाला असून दाखल झालेले लाखो पर्यटक इथल्या सांस्कृतिक वारशांसह समुद्राचा आणि पार्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. एकूणच सर्वत्र जल्लोषी वातावरण सुरू असून नववर्षाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरातील पर्यटकांची पावले गोव्याकडे वळतात. त्याला इथला समृद्ध निसर्ग, फेसाळणारा समुद्र आणि काहीशी पाश्चिमात्य संस्कृती कारणीभूत आहे. त्यासाठीच आंतरराष्ट्रीय पर्यटक ही गोव्याला आवर्जून भेट देतात. सध्या देशी-विदेशी पर्यटकांनी राज्य भरले असून इथले रस्ते आणि समुद्रकिनारे पर्यटकांनी ओसंडून वाहत आहेत. दिवसभर इथली शहरे, मंदिर, चर्च यांचा आनंद घेतल्यानंतर हे पर्यटक समुद्रात आयोजित केल्या जाणार्या वॉटर स्पोर्टस्चाही आनंद घेत आहेत. रात्री हॉटेल्स, क्लब, रेस्टॉरंट यांच्यात आयोजित केला जाणार्या पार्ट्यांमध्ये पर्यटक सहभागी होताना दिसत आहेत. यासाठी देशी, विदेशी, गायक, नर्तक आणि डीजे आपली सांगतिक कला सादर करत आहेत.
पर्यंतचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. आश्वे, मांद्रे हरमल या परिसरात विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. हीच स्थिती दक्षिण गोव्यातही बघायला मिळत आहे. दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली, वार्का पाळोळे येथील किनार्यांवर देशी व पर्यटक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दोन्हीही जिल्ह्यांमध्ये कडेकोट बंदोबस्त असून ठिकठिकाणी पोलिस तैनात आहेत. प्रामुख्याने मंदिरे, चर्चेस आणि पर्यटन स्थळांजवळ पोलिस दिसत आहेत. वाहतूक पोलिसांचीही संख्या वाढवण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यावर वाहतूक पोलिसांचा भर आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली आहे.