Crime Victim Compensation | आरोपी सुटला तरी पीडितांना दिलासा! राज्य सरकारकडून मिळणार 10 लाखांपर्यंत मदत

Crime Victim Compensation | महिला, बालपीडितांसाठी 10 लाखांपर्यंत मदत; अर्जासाठी 180 दिवसांची मुदत
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षक शिंदेंना अतिरिक्त वेतनवाढ द्या !File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गुन्ह्यातील आरोपीचा शोध लागला नाही किंवा पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटला, तरी गुन्हे पीडितांना आता राज्याच्या नुकसानभरपाई योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळू शकणार आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या पुनर्वसनासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

Sambhajinagar News
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

बलात्कार, मानवी तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मानसिक आघात झालेल्या महिला आणि बालपीडितांना १० लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. ॲसिड हल्ल्यातील पीडितांना परिस्थितीनुसार ३.५ लाख ते ५ लाख रुपये मदत मिळू शकते.

कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाईची कमाल मर्यादा २ लाख रुपये आहे. अपंगत्वाच्या प्रकरणात १० हजार ते ५० हजार रुपये मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Sambhajinagar News
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

जमावाकडून हत्या किंवा हिंसाचाराच्या कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, अन्य कुटुंबीयाचा मृत्यू किंवा ८० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपये, तर गंभीर दुखापत किंवा ४० ते ८० टक्के अपंगत्वासाठी ५० हजार रुपये नुकसानभरपाई मिळू शकते.
नुकसानभरपाईसाठी अर्ज सामान्यतः १८० दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. कायदेविषयक सेवा प्राधिकरणाने प्राप्त दाव्यांवर दोन महिन्यांच्या आत निर्णय घेणे अपेक्षित आहे. गरजेनुसार पीडितांना तातडीची मोफत वैद्यकीय सेवा आणि अंतरिम आर्थिक मदत देण्याचे आदेशही दिले जाऊ शकतात. मात्र, मोटार वाहन अपघातातील नुकसानभरपाईची प्रकरणे या योजनेच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news