Colvale Central Jail | कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेचा बोजवारा; कैद्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले जेलमधील फोटो!

Colvale Central Jail | कारागृहातील सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न; कैद्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टने पोलीस प्रशासन चक्रावले.
Colvale Jail
Colvale JailPudhari Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
करंझाळे-पणजी येथे झालेल्या मारहाण प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार आरोपींनी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Colvale Jail
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

शोएब बेग, झाकीउल्ला काझी, रेहान भगवान आणि जेडन सोझा हे सध्या कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या चौघांनी कारागृहातील छायाचित्र इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारागृहात बंदी असतानाही कैद्यांकडे मोबाईल फोन कसा पोहोचला आणि त्याचा वापर कसा केला जात आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.


कारागृहात मोबाईल फोनचा वापर करण्यास बंदी असतानाही अशा प्रकारे सोशल मीडियावर छायाचित्रे पोस्ट झाल्याने सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही कोलवाळ कारागृहातून मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या वापरासंदर्भातील प्रकरणे समोर आली आहेत. कैद्यांकडून सोशल मीडियाचा वापर होत असल्याचे समोर आल्याने कोलवाळ कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news