

बाणावली : युवकांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी आणि सामाजिक उभारणीत युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांच्या संकल्पनेतून बाणावलीतील डॉन बॉस्को येथे “टेनर्जी 2025”या अनोख्या युवा क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोलवा युवा संघाने महोत्सवाचे सांघिक जेतेपद प्राप्त केले.
बाणावली मतदारसंघातील 7 गावांमधील एकूण 12 संघांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता. प्रत्येक संघामध्ये 10 सदस्य होते, ज्यापैकी 6 मुले तर 4 मुली अशा सर्वसमावेशक संघांनी महोत्सवामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. महोत्सवातील उपक्रमांमध्ये लगोरी, ड्रॅग फुटबॉल, टिक - टॅक आणि सीटिंग थ्रोबॉल सारख्या पारंपरिक खेळ प्रकारांसोबत मास्टर इन्फ्लुएन्सर सारख्या अत्याधुनिक खेळ प्रकारांचाही समावेश होता. या खेळांचे सामने सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू होते.