Goa Power Crisis | कमी दर्जाच्या कोळशामुळे देशभरात वीज संकट! गोव्यातील उद्योगांना 5 ते 9 दरम्यान लोडशेडिंगचा फटका

Goa Power Crisis | स्टीफन फर्नांडिस : गोव्यातील समस्येवर लवकरच तोडगा काढण्याचा विश्वास
Electricity
Electricitypudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

देशभरामध्ये सध्या विजेची समस्या निर्माण झाली आहे. त्याला कारण कमी दर्जाचा कोळसा आहे. कमी दर्जाचा कोळसा मिळाल्यामुळे त्याद्वारे योग्य तेवढी वीज उत्पादन होत नसल्यामुळे विजेची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या गोव्यातील उद्योगांनाही जाणवत आहे. या समस्येवर मंगळवारी तोडगा निघेल, अशी माहिती वीज खात्याचे प्रधान मुख्य अभियंते स्टीफन फर्नांडिस यांनी दिली आहे.

Electricity
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

गोव्यातील उद्योगांना संध्याकाळी ५ ते रात्री ९ या दरम्यान विजेच्या लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उद्योगांचे उत्पादन घटले असून, सरकारने यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी गोवा चेंबर्स ऑफ इंडस्ट्रीज, तसेच इतर उद्योग संघटनांनी सरकारकडे केली होती. त्यासंदर्भात फर्नांडिस यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.

स्टीफन फर्नांडिस म्हणाले, की गेले १५ दिवस ही समस्या जाणवत आहे. गोवा चेंबरचे निवेदन सरकारला पोहोचलेले आहे. पूर्ण देशामध्ये कमी दर्जाच्या कोळसा उत्पादनामुळे वीज समस्या असल्याने लोड शेडिंग करावे लागते. गोव्यामध्ये ८० ते १०० मेगावॉट वीज कमी मिळत आहे. त्यामुळेच लोडशेडिंग करावे लागत असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.

Electricity
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

कोळशासह अन्य काही कारणे असली तरी कोळसा हेच मुख्य कारण असल्याचे सांगून फर्नांडिस म्हणाले की, खासगी कंपन्यांकडे वीज उपलब्ध आहे. मात्र ती प्रति युनिट १० रुपये आहे. जी गोव्याला परवडणारी नाही. कारण गोव्यात वीज दर कमी आहेत. याबाबत राज्यातील उद्योग प्रतिनिधींशी चर्चा करून मंगळवारी प्रमुख उद्योग प्रतिनिधी सोबत वरिष्ठ पातळीवर सरकार बैठक घेऊन यावर तोडगा काढणार असल्याचे फर्नांडिस यांनी नमूद केले.

वीज बिलात ५० टक्के सवलत द्या : कोचकर:

वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याची मागणी वेर्णा उद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष व उद्योजक दामोदर कोचकर यांनी केली आहे. उद्योगांना होत असलेल्या अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे मोठे नुकसान होत आहे. उद्योगांना जनरेटरच्या माध्यमातून उद्योग चालवावे लागत आहेत. त्यामुळे खर्च वाढलेला आहे. तो खर्च वसूल होण्यासाठी उद्योगांच्या वीज बिलामध्ये ५० टक्के कपात करावी, अशी मागणी कोचकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news