Subhash Shirodkar Birthday | सुभाष शिरोडकर राज्याचे 'आयडॉल' राजकारणी! वाढदिवसानिमित्त CM प्रमोद सावंत यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

Subhash Shirodkar Birthday | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
Subhash Shirodkar Birthday
Subhash Shirodkar Birthday
Published on
Updated on

बोरी : पुढारी वृत्तसेवा

सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हे राज्याचे आयडॉल राजकारणी आहेत. त्यांचा राजकीय प्रवास पाहत आम्ही राजकारणात घडलो. शिरोडा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांची तळमळ मी जवळून पाहिली आहे. त्यांनी आजवर जे खाते सांभाळले, त्या खात्यात त्यांनी अमुलाग्रह बदल केला आहे.

Subhash Shirodkar Birthday
Sanskriti Kale Murder Case | संस्कृती काळे खून प्रकरणात मोठी अपडेट! नाशिक पोलिसांचे पथक अकोल्याला रवाना, तपासाला वेग

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री शिरोडकर हे शतायुषी होवोत, अशा सदिच्छा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री शिरोडकर यांना दिल्या. राज्याचे सहकार, जलस्त्रोत व प्रोव्हेदोरिया मंत्री सुभाष शिरोडकर यांचा वाढदिवस शिरोडा पंचायतीच्या क्रीडा मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, जिल्हा पंचायत सदस्य डॉ. गौरी शिरोडकर, पुनम सांमत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, मंत्री शिरोडकर हे नेहमी दूरगामी विचार करतात. राजकारणात असूनही त्यांनी कधी फायद्यासाठी राजकारण केले नाही. राजकारणातून चांगल्या पद्धतीने समाजकार्यही करता येते, हे शिरोडकर यांनी दाखवून दिले आहे.

Subhash Shirodkar Birthday
Harmal Gram Sabha Goa | हरमलमध्ये स्पा आणि मसाज पार्लरवर कायमची बंदी! अनैतिक प्रकारांमुळे ग्रामसभेत संतापाचा उद्रेक

जलस्त्रोत खात्याचे मंत्रीपद सांभाळताना त्यांनी पुढील २५ वर्षांचा विचार करून पाण्याचे नियोजन केले आहे. शिक्षण क्रांती घडवून आणतानाच तळागाळातील माणसाला न्याय देण्याचा केलेला प्रयत्न हेच त्यांचे यश आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मंत्री शिरोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सागर नाईक, डॉ. गौरी शिरोडकर, अक्षय गावकर व अवधूत नाईक यांनी रोपटी प्रदान केली. केक कापून मंत्री शिरोडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मंत्री शिरोडकर यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचलन समृद्धी गणपुले यांनी केले. यावेळी विविध कलाकार, मूर्तीकार, नृत्यांगना, युवा उद्योजकांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news