Goa| आता निलंबन नाही, बडतर्फीच : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

No suspension, only dismissal: Chief Minister - मुख्यमंत्री : प्रशासनातील भ्रष्टाचार खपवून न घेण्याचा इशारा
CM Pramod Sawant
CM Pramod Sawantpudhari photo
Published on: 
Updated on: 

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात म्युटेशन प्रकरणांच्या मंजुरीसाठी लाच घेतली जात असल्याचा गंभीर आरोप दक्षिण गोवा वकील संघटनेने केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. किंवा लाचखोरी खपवून घेतली जाणार नाही, आणि असे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांचे निलंबन नव्हे तर थेट सेवेतून बडतर्फीच केली जाईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

लाच स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

CM Pramod Sawant
Yoga Health Campaign | आरती मुंडये यांचा योगातून शरीर संपदाचा प्रचार

प्रशासनाला शिस्त पाळण्याचे आवाहन

म्युटेशन नोंदी आणि जमिनीशी संबंधित इतर प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांची कामे विनाकारण अडकवून ठेवणारे आणि भ्रष्टाचारी अधिकारी यांनी कोणत्याही सुटकेचा विचार करू नये, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. भविष्यात असा कोणताही प्रकार पुन्हा समोर आल्यास थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, यावर त्यांनी पुन्हा एकदा भर दिला आहे.

CM Pramod Sawant
Goa Industrial Development | गोवा आयडीसीच्या 'एक्झिट सपोर्ट' योजनेला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ जाहीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news