

पर्वरी : घर मूळ गोमंतकीयांना मिळावे, ही संकल्पना गोवा गृह मंडळाची आहे. प्रत्येक गोवेकराला घर मिळावे हे आमचे उद्दिष्ट आहे. गरिबांना आणि गरजूंना घर मिळावे म्हणून मंडळातर्फे घर किंवा फ्लॅट देण्याची योजना सुरू झाली असून गोमंतकीयांना अल्प दरात घरे उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोवा गृह मंडळाच्या नूतनीकरण केलेल्या मुख्यालयाचे उद्घाटन गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडाळाचे अध्यक्ष आमदार जीत आरोलकर, सचिव, संचालक मंडळ आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणले, म्हजें घर