CM Dr. Pramod sawant news | माझी प्रकृती ठणठणीत : मुख्यमंत्री डॉ. सावंत

आज गोव्यात येणार
CM Dr. Pramod sawant
CM Dr. Pramod sawant
Published on
Updated on
Summary
  • सर्व रिपोर्ट नॉर्मल; मुख्यमंत्र्यांची माहिती

  • डिस्चार्ज घेऊन पुण्यातच थांबलोय

  • काळजी न करण्याचे लोकांना आवाहन

पणजी : आपण पुण्याला आल्यानंतर त्रास होऊ लागल्याने येथील एका हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. आपले सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत; आपली तब्येत ठीक आहे, आपण डिस्चार्ज घेऊन कुटुंबासोबत पुण्यातच आहे. उद्या शनिवारी आपण गोव्यात पोहोचू. गोव्यात येऊन दैनंदिन कामकाजाला सुरुवात करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

शुक्रवारी सायंकाळी एक व्हिडिओ जारी करून डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, पुण्यात गेल्यानंतर येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये मी तपासणी केली. रात्रभर तेथे राहिलो व आज शुक्रवारी डिस्चार्ज घेतला. मात्र, गोव्यात सकाळपासून माझ्या तब्येतीबाबत बरीच चर्चा सुरू आहे. अफवा पसरवल्या जात आहेत. लोकांनी काळजी करू नये. दोन दिवसांत माझे नियमित काम मी सुरू करणार आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

डॉ. सावंत यांनी पुण्याला जाऊन अँजिओप्लास्टी केल्याचे वृत्त सर्वत्र पसरले असून, अनेक माध्यमांनी तसे वृत्त दिले आहे. त्यामुळे सर्वांनाच मुख्यमंत्र्यांना नेमके काय झाले याबाबत काळजी होती. अखेर डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष डॉक्टर परवेझ ग्रँट यांनी वेगवेगळे व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली. सकाळी डॉक्टर ग्रँट यांनी एक व्हिडिओ जारी केला व त्यांनी डॉ. सावंत यांच्या विविध तपासण्या आपल्या क्लिनिकमध्ये केल्याचे सांगून डॉ. सावंत यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झाली नसल्याचे स्पष्ट केले.

सायंकाळी डॉ. सावंत यांनी व्हिडिओ जारी केला. दुपारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनीही माध्यमांना मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची माहिती दिली. आपण वैयक्तिकरीत्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोललेलो आहे, त्यांची तब्येत ठीक आहे. ते उपचारासाठी पुण्याला गेले नव्हते. असे सांगून डॉ. सावंत यांची अँजिओप्लास्टी झाल्याचे ऐकले आहे, असे नाईक म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news