

पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या ६९ व्या जयंती निमित्ताने त्यांच्या मिरामारी येथील स्मृतिस्थळाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, जिल्हा अधिकारी स्नेहा गीते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, स्वर्गीय पर्रीकर यांनी गोव्यासाठी आणि देशासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या विचारानेच आपले सरकार राज्यकारभार करत असून त्यांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी सरकारच्या वतीने विविध प्रयत्न केले जात आहेत. यावेळी त्यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या फोटो प्रदर्शनाचे यावेळी लोकार्पण करण्यात आले.