Cardiac Arrest Risk After 60 |साठीनंतर वाढतो कार्डियाक अरेस्टचा धोका; जाणून घ्या बचावाचे ५ उपाय

साठीनंतर वाढतो कार्डियाक अरेस्टचा धोका; जाणून घ्या बचावाचे ५ उपाय
Cardiac Arrest Risk After 60
Cardiac Arrest Risk After 60
Published on: 
Updated on: 

अभिनेते नाना पाटेकर यांच्या कार्डियाक अरेस्टमुळे झालेल्या निधनाच्या बातमीनंतर हृदयाचे आरोग्य आणि अचानक येणाऱ्या कार्डियाक अरेस्टबाबत चर्चा रंगली आहे. गंभीर कार्डियाक अरेस्टनंतर ७५ वर्षीय नाना पाटेकर यांचा जीव सीपीआर देऊनही वाचवता आला नाही. या पार्श्वभूमीवर वृद्धांमध्ये वाढत्या कार्डियाक अरेस्ट व हृदयाच्या आजारांची चर्चा सुरू झाली आहे. वयाच्या ६० वर्षानंतर अचानक कार्डियाक अरेस्टचा धोका वाढू शकतो, विशेषतः हाय ब्लड प्रेशर, डायबिटिस आणि हाय कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या नियंत्रणात नसतील. अशावेळी कार्डियाक अरेस्टपासून वाचण्यासाठी करायच्या उपाययोजनांचा हा आढावा...

कार्डियाक अरेस्ट, हार्ट अॅटॅक यात फरक काय?

हार्ट अॅटॅक

हृदयात रक्त पोहोचवणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा येतो.

छातीत दुखणे ही मुख्य लक्षणे.

कार्डियाक अरेस्ट

हृदय अचानक धडधडते आणि बंद होते.

काही मिनिटांत जीवाला धोका.

हार्ट अॅटॅक हा अनेकदा कार्डियाक अरेस्टचे कारण ठरू शकतो.

धोका वाढवणारे घटक

प्रेशर हाय ब्लड

डायबिटिस

वाढलेले कोलेस्ट्रॉल

व्यायामाचा अभाव

डॉक्टराचा सल्ला

अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या हृदयविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वय वाढू शकते. पण हृदय निरोगी ठेवणे आपल्या हातात आहे.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी -

बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा

नियमित तपासणी करा. डॉक्टरांनी सुचविलेली औषधे वेळेवर घ्या. स्वतःहून औषधे बंद करू नका/डोस बदलू नका.

इशारा देणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

छातीत दुखणे, दबाव, श्वास गुदमरणे. चक्कर येणे, पडणे, हृदयाचे ठोके जलद होणे.

दररोज शारीरिक हलका स्ट्रेचिंग व्यायाम.

जास्त मेहनत करू नका. नवीन व्यायामापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

निरोगी जीवनशैली स्वीकारा

संतुलित आहार घ्या, धूम्रपान व मद्यपान टाळा. पुरेशी झोप घ्या, तणाव कमी ठेवा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news