

पणजी ः करंझाळे येथील येथील पारंपरिक मच्छीमारांनी समुद्रातील माशांमध्ये जड धातू (हेवी मेटल्स) आढळल्याच्या पार्श्वभूमीवर माशांच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत, गोवा विद्यापीठ व राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (एनआयओ) यांच्या शास्त्रज्ञांनी तातडीने स्पष्ट अहवाल द्यावा, तसेच किनारपट्टीवर उभारण्यात आलेला लोखंडी टॉवर काढण्याची मागणी केली आहे.
माशांचे सेवन सुरक्षित आहे की नाही, याबाबत पुढील तीन दिवसांत स्पष्टता द्यावी, अशी ठाम मागणी करंझाळे रापणकार व पारंपरिक मच्छीमारी संघटनेने मत्स्य व्यवसाय संचालकांच्या उपसंचालकांची भेट घेऊन केली. समुद्रातील प्रदूषणामुळे मच्छीमारांच्या उपजीविकेवर थेट परिणाम होत असून, बांधकाम व्यावसायिक लॉबी पारंपरिक मच्छीमारांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही मच्छीमारांनी केला आहे. जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा तसेच न्यायालयात जाण्याचा इशाराही मच्छीमार संघटनांनी प्रशासनाला दिला आहे. गोवा विद्यापीठ व राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (एनआयओ) यांच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या अहवालाबाबत काहीच कल्पना नाही अशी माहिती मच्छिमार उपसंचालकांनी दिली.
येत्या सोमवारी संघटनेची तसेच अहवाल सादर केलेल्या विभागांची संयुक्त बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेचे फ्रांसिस्को वाझ यांनी दिली. हे जड धातू करंझाळे समुद्रकिनार्यावरील माशांमध्ये कसे आढळून आले व त्याला कसिनोमुळे होणारे प्रदूषण जबाबदार आहे का, याबाबत काहीच स्पष्टीकरण केलेले नाही, असे फ्रांसिस्को वाझ म्हणाले.
गोवा विद्यापीठ व राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (एनआयओ) यांच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या अहवालाबाबत काहीच कल्पना नाही अशी माहिती मच्छिमार उपसंचालकांनी दिली. येत्या सोमवारी संघटनेची तसेच अहवाल सादर केलेल्या विभागांची संयुक्त बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेचे फ्रांसिस्को वाझ यांनी दिली. हे जड धातू करंझाळे समुद्रकिनार्यावरील माशांमध्ये कसे आढळून आले व त्याला कसिनोमुळे होणारे प्रदूषण जबाबदार आहे का, याबाबत काहीच स्पष्टीकरण केलेले नाही, असे फ्रांसिस्को वाझ म्हणाले.