

काणकोण: पुढारी वृत्तसेवा
नाताळ सण जवळ आल्याने काणकोण तालुक्यातील ख्रिस्तीचांधवाच्या घरोघरी लगबग बाढली आहे. परदेशात नोकरी पंद्यानिमित्त असलेले ख्रिस्तीवांधव मूळस्थानी येऊ लागले आहेत. काणकोण बाजारातही ख्रिसमसचा उत्साह दिसत आहे.
काणकोण शहरात ख्रिस्ती बांधवांची लोकसंख्या कमी असली तरी येथील ख्रिस्ती बांधव नाताळ सण परंपरेप्रमाणे मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा करतात. हिंदूही या सणात मोठ्या उत्साहात सहभागी होतात. ख्रिसमस निमित्त घरांसन्त कपेल, कॉस (खुरीस) यांची रंगरंगोटी सुरू झाली आहे.
ख्रिस्ती बांधवांनी सध्या गोठा आदी सजावटीच्या कामाकडे लक्ष केंद्रित केले आहे. नाताळाच्या पूर्वरात्री काणकोण शहरातील सेंट तेरेसा ऑफ जिज्ञास सायचिणीच्या चर्चमध्ये प्रार्थनासभा आदी कार्यक्रम होणार आहेत. तूर्तास सर्वच जण तयारीत गुंतले आहेत, साहित्य खरेदी करून घरी आणून इव्ळूहळू तयारी करण्याचे काम चालू आहे. काही जणांची तयारी पूर्णत्याकडेही आली
गोडधोड बनविण्याची तयारी
काणकोण बाजारातील अनेक दुकाने सध्या ख्रिसमस साहित्याने सजली आहेत, विविध प्रकारची नक्षत्रे, ख्रिसमस ट्री, स्नोबॉल, सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या, तयार गोते आदी साहित्याने बाजारपेठला नवा साज चहला आहे. या साहित्याची खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू असून बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. घरोघरी करंज्या आदी गोडधोड खाद्यपदार्थ बनविण्याची लगबगही सुरू आहे, असे एक खिस्ती बांधव स्टॅनली ग्रासिएस यांनी सांगितले.
येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारित भव्य देखावे उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील आठवडयांत शहरात ख्रिसमसचा उत्साही वातावरण तयार होणार आहे.
लेव्हीन ग्रासियस, चावडी