Casino Honey Trap Case | संदीप मालपे खुनामागे 'हनीट्रॅप'; महिला ताब्यात

Casino Honey Trap Case |कळंगुट-कर्नाटक पोलिसांची मंगळुरू येथे कारवाई
Honey Trap
Honey TrapPudhari
Published on
Updated on

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

उडुपी, कर्नाटक येथील वॉटर स्पोर्टस् व्यावसायिक संदीप सलायम मालपे (वय ४२) यांच्या मृत्यूप्रकरणात बेपत्ता असलेल्या संशयित महिलेला कळंगुट पोलिसांनी अखेर अटक केली. अक्षता उर्फ रूपाश्री सी. असे या संशयित महिलेचे नाव असून कर्नाटक पोलिसांच्या मदतीने तिला मंगळुरू येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

Honey Trap
Tilari ghat | तिलारी घाटात निर्जन ठिकाणी महिलेच्या मृतदेहापाठोपाठ आढळली बेवारस स्कूटर! प्रकरणाचे गूढ वाढले

कॅसिनोत ओळख वाढवून श्रीमंतांना हनी ट्रॅपमध्ये ओढून त्यांना लुबाडण्याचा तिचा फंडा असल्याचे समजते. श्रीमंत व्यक्तींना जाळ्यात ओढून हॉटेलमध्ये नेणे, त्यांना बेशुद्ध करून लुबाडणे आणि हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करणे, अशी या संशयित महिलेची मोडस ऑपरेंडी आहे. यापूर्वी गुजरातमधील व्यावसायिक तोमेश यादव यांना अशाच प्रकारे यावर्षी एप्रिलमध्ये हॉटेलवर बेशुद्ध करून या महिलेने २.४ लाख व १५.४ लाख रुपयांचे दागिने लुटले होते.

मात्र, या गुंगीच्या औषधाच्या प्रकारातून सुदैवाने यादव बचावले होते. संदीप याचा भाऊ चेतन याने याबाबतची तक्रार कळंगुट पोलिस स्थानकात दिल्यानंतर कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता, तर दुसऱ्या दिवशी या संशयित महिलेविरोधात लुबाडणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्या अटकेमुळे संदीप याच्या खुनाचा उलगडा होणार आहे.

अटकेमुळे लवकरच प्रकरणाचा गुंता सुटेल

संदीप सलायम याच्या मृत्यूनंतर संशयित महिला गोव्यातील मंगळुरूकडे पसार झाल्याची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांचे पथक बुधवारी १ जुलै रोजी कर्नाटकात रवाना झाले होते. सलग तीन दिवस या पथकाने पोलिसांच्या मदतीने कसून शोध घेत शुक्रवारी (दि. ३) तिला पकडले. या संशयित महिलेचा ट्रांझिट रिमांड घेण्यात आला असून, पोलिस पथक तिला घेऊन गोव्यात दाखल होणार आहे. त्यानंतर संदीप यांना कोणते गुंगीचे औषध पाजले होते आणि या मृत्यूचा नेमका घटनाक्रम काय, याचा उलगडा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news