Goa AAP News | गीतेश नाईक यांचा आपमध्ये प्रवेश

Gitesh Naik AAP | फोंड्यात आपची तळागाळातील ताकद अधिक मजबूत
Goa AAP News | गीतेश नाईक यांचा आपमध्ये प्रवेश
Published on
Updated on

पणजी : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, गोवा प्रभारी अतिशी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी बहुजन समाजातील सामाजिक कार्यकर्ते आणि नेते गीतेश नाईक आपमध्ये जाहीर प्रवेश केला. मागील १५ वर्षांहून अधिक काळ सामाजिक कार्यात सक्रिय असलेले गीतेश नाईक यांनी आपल्या अनेक समर्थकांसह पक्षात प्रवेश केला, ज्यामुळे फोंडा मतदारसंघात आप पक्षाची तळागाळातील ताकद अधिक मजबूत झाली आहे.

गीतेश नाईक यांच्या पक्षप्रवेशावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे जो लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करतो, तर दुसरीकडे इतर पक्ष लोकांचे पैसे लुटण्यात गुंतलेले आहेत. त्यांनी नमूद केले की दिल्ली आणि पंजाबमध्ये आप सरकारने मोफत वीज, पाणी, दर्जेदार शिक्षण आणि उत्कृष्ट आरोग्यसेवा दिली आहे आणि हाच विकासाचा मॉडेल फोंडा व संपूर्ण गोव्यात आणण्याचा पक्षाचा निर्धार आहे. तसेच येणाऱ्या पोटनिवडणुकीत फोंड्यातून आपचा तिसरा आमदार निवडून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पक्षात प्रवेश केल्यानंतर गीतेश नाईक यांनी सांगितले की, फोंड्याच्या विकासासाठी ते अधिक जोमाने काम करण्यास उत्सुक आहेत आणि आम आदमी पार्टीचा भाग असल्याचा त्यांना आनंद आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आपचा पाठिंबा आणि अरविंद केजरीवाल यांचे मार्गदर्शन त्यांच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि लोकसेवेसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यास मदत करेल.

आप गोवा प्रभारी अतिशी यांनी गीतेश नाईक यांच्या बहुजन समाजातील नेतृत्वाचे आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. वाल्मिकी नाईक म्हणाले, आम आदमी पार्टी ही कामाच्या राजकारणावर विश्वास ठेवते आणि फोंड्यांतील रुग्णालयांची स्थिती, रस्ते, प्रशासन आणि सांडपाणी व्यवस्थेचे प्रश्न सोडवले जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news