Birch Bar and Club Fire Case | दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना वीस लाख रुपयांची भरपाई द्या!

Birch Bar and Club Fire Case | हडपडे बर्च् क्लब अग्निकांड प्रकरण; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी वीस लाख रुपयांची भरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Court
CourtFile Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लब दुर्घटनेतील २५ मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपयांची अंतरिम नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने एलएलपी कंपनीचे भागीदार लुथरा ब्रदर्स व अजय गुप्ता या तिघांना दिले आहेत. संबंधित कंपनीने ही भरपाईची रक्कम ७ फेब्रुवारी २०२७ पर्यंत न्यायालयात जमा करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

Court
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

पुढील सुनावणी २ डिसेंबरला ठेवली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला. सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता यांच्या कंपनीने प्रत्येकी २० लाख रुपयांप्रमाणे एकूण पाच कोटी रुपये न्यायालयात जमा करावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायाल्याने भरपाईची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, १६ नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपये, ७ डिसेंबर रोजी आणखी ५ लाख रुपये, तर उर्वरित १० लाख रुपये ७ फेब्रुवारी २०२७ पर्यंत जमा करावे लागणार आहेत.

Court
Foreign Woman Rape Case | परदेशी महिलेवरील बलात्कारप्रकरणी बंगळुरुस्थित खासगी कंपनीच्या सीईओला पणजी महिला पोलिसांकडून अटक

कंपनीने यापूर्वी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिले आहेत. ही रक्कम नव्याने देण्यात येणाऱ्या २० लाख रुपयांच्या अंतरिम भरपाईव्यतिरिक्त असेल. दरम्यान, पाच पर्यटक मृतांपैकी चार जणांच्या कुटुंबीयांनी हरियाणा येथील ग्राहक मंचाकडे नुकसानभरपाईचे स्वतंत्र तक्रारी तथा दावे दाखल केले आहेत. एका पर्यटक कुटुंबाने दावा दाखल केलालेला नसला तरी त्याची रक्कम उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा राहील, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.