CM Pramod Sawant | आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळण्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दृढ विश्वास

CM Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला विश्वास
Chief Minister Dr. Pramod Sawant
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सरकारचे काम चांगले असून, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळेल. त्यासाठी पक्षांतर किंवा फुटीर आमदारांची गरज भासणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

दोनापावला येथे मंगळवारी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या 'शाश्वत गोवा' कार्यक्रमात ते बोलत होते. विविध प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेली आठ वर्षे आपण मुख्यमंत्री म्हणून काम करत आहोत.

आता कामाचा चांगला अनुभव असून, निवडणुकीत चांगली कामगिरी करून विजय मिळवू, असा विश्वास आहे. डबल इंजिन सरकारच्या सहकार्याने गोव्याचा शाश्वत विकास झाला असून, हा बदल लोकांना दिसत आहे.

राहुल गांधींशी चर्चेला तयार

एसआयआर आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून पंत्रधानांनी आपल्याशी चर्चा करावी, असे राहुल गांधी सांगतात. मात्र, पंतप्रधानांची गरज नाही; आपण स्वतः राहुल गांधी यांच्याशी या विषयावर कुठेही जाहीर चर्चेला तयार आहोत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.


केजरीवाल सध्या मोकळे असल्याने अधूनमधून सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात येतात, अशी टिप्पणी त्यांनी दोघांच्या गोव्या दौऱ्याबाबत केली. आपण मुख्यमंत्री झालो, तेव्हा शाश्वत विकासात गोवा देशात सातव्या क्रमांकावर होता. तो आता तिसऱ्या क्रमांकावर आणला आहे. मोठे उद्योग गोव्यात येत असल्याने राज्याचा जीडीपी वाढला आहे.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Panaji shopkeepers fire safety demand|पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका

एसआयआर आणि व्होटचोरी हे विरोधकांचे मन समाधान करण्यासाठी उपस्थित केलेले विषय असून, त्यात तथ्य नाही. गोव्यात सेकंड होम चालेल पण सेकंड वोट चालणार नाही, असेही ते म्हणाले. कँग्रेसचे काही निवडून आलेले आमदार पक्षात राहू इच्छित नव्हते. तेथे नेतृत्व नसल्याने ते भाजपमध्ये आले आणि आपण त्यांना प्रवेश दिला.

आपण कोणतेही आमदार फोडले नाहीत, असे स्पष्टीकरण त्यांनी पक्षांतराच्या मुद्द्यावर दिले.
आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील युती आता डळमळीत झाली आहे. केजरीवाल सत्तेवर येणार नसवाने मोठी आश्वासने देत आहेत. ती पूर्ण करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.