

पणजी ः जुने गोवे येथे एका कारने आज सकाळी नऊच्या सुमारास धडक दिल्याने पंचसदस्य ॲड. भुवनेश्वर फातर्पेकर हे जखमी झाले. या अपघातप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी अपघाताचा गुन्हा अज्ञाताविरुद्ध नोंद केला आहे. हा अपघात की घातपाताचा प्रयत्न असा संशय कुटुंबियाकडून व्यक्त केला जात आहे.
या अपघातप्रकरणी पोलिसांनी जखमी फातर्पेकर यांनी कारच्या रंगाची माहिती दिलेल्या कार चालकाला ताब्यात घेतले आहे, मात्र तो नसल्याचे जखमी फातर्पेकर याने पोलिसांना सांगितले आहे. ज्यावेळी अपघात झाला तेव्हा हिरव्या रंगाची कार तेथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत आहे. जुने गोवे पोलिस आणून चौकशी सुरू केली आहे. चालकाने त्याच्या कारला अपघात झाला नसल्याचे सांगितले आहे.