BhashaSnap App | गोवा विद्यापीठात भाषास्नॅप वेब अ‍ॅपचे अनावरण, 22 भारतीय भाषांमध्ये मिळणार शैक्षणिक सामग्री

BhashaSnap App | गोवा विद्यापीठात अ‍ॅपचे अनावरण तसेच विविध सुविधांचेही उद्घाटन
BhashaSnap App
BhashaSnap App
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सुमारे २८.५५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह भाषास्नॅप वेब अ‍ॅप उपक्रम गोवा विद्यापीठाची शैक्षणिक आणि संशोधन पायाभूत सुविधा मजबूत करण्यात उपयुक्त आहेत. तसेच विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांसाठी नवीन संधी निर्माण करतात. शिक्षण अधिक सर्वसमावेशक आणि सुलभ करण्याच्या दिशेने भाषास्नॅप हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

BhashaSnap App
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

२२ अधिसूचित भारतीय भाषांमध्ये द्विभाषिक सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेले हे अ‍ॅप , विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत शैक्षणिक संसाधने मिळवण्यास सक्षम आहे. या उपक्रमाचे नेतृत्व केल्याचा गोव्याला अभिमान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंगळवारी गोवा विद्यापीठाच्या आवारातील गोवा बिझनेस स्कूलमध्ये भाषास्नॅप वेब अ‍ॅपसह विविध सुविधांचे अनावरण केले.

तसेच नवीन संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञान इमारतीचे व स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसमधील रोबोटिक्स आणि आयओटी लॅब व मशीन लर्निंग लॅब यांसारख्या प्रगत संशोधन सुविधांचे उद्घाटन केले.

BhashaSnap App
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

मुख्यमंत्र्यांनी भारत-पोर्तुगाल द्विनलॅब भागीदारीसाठी गोवा विद्यापीठ आणि पोर्तुगालच्या पोर्तो विद्यापीठातील बायोपोलिस-सिबिओ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या (एमओयू) देवाण-घेवाणीलाही हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, या सहकार्यामुळे जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण, संवर्धन, परिसंस्थेचे निरीक्षण आणि पर्यावरणीय शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून आंतरराष्ट्रीय संशोधन, वैज्ञानिक देवाण-घेवाण आणि क्षमता बांधणीला प्रोत्साहन मिळेल.

या कार्यक्रमात इलेक्ट्रिक बसेसचे उद्घाटन आणि गोवा विद्यापीठाच्या ई-मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. जे विद्यापीठाची नवोन्मेष आणि शाश्वत विकासाप्रती असलेली वचनबद्धता दर्शवते. या सोहळ्याला शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू राजेंद्र गाड, कुलसचिव डॉ. सुंदर धुरी, उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर, पोर्तुगालचे नोनू आल्मेदा आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.