Dinesh Gawade Death Goa | गव्याचा हल्ला की घातपात? बेतोडा येथील दिनेश गावडे मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले

Dinesh Gawade Death Goa | गवा हल्ल्याबाबत प्रश्नचिन्ह : पोलिसांकडून चौकशी सुरू
death
death pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

बेतोडा येथे गव्याच्या हल्ल्यात साखळी येथील दिनेश गावडे (वय ४८) यांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले आहे. वन खात्याने केलेल्या प्राथमिक चौकशीत गव्याच्या हल्ल्याच्या जखमांबाबत विसंगती आढळून आल्याने संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून करण्यात आली आहे.

death
Goa Casino Controversy | कॅसिनो नावाचे राज्याच्या मुळावर उठलेले संकट

याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशीअंती मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. यासंदर्भात वनमंत्री विश्वजित राणे यांनी वन अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या संशयाची दखल घेतली आहे. तो त्यांच्या मतदारसंघातील कर्मचारी होता. त्यामुळे या घटनेची पारदर्शक पोलिस चौकशी होणे गरजेचे आहे.

त्यातून जे काही असेल ते सत्य समोर येईल, असे राणे यांनी मत व्यक्त केले आहे. पोलिस खात्यात गृहरक्षक म्हणून कामाला असलेल्या गावडे याचा मृत्यू गवाच्या हल्ल्यानेच झाल्याचा दावा केला गेला होता. त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी बारकाईने केलेल्या तपासणीत त्याच्या शरीरावर असलेल्या जखमा संशयास्पद आहेत. त्या गव्याने हल्ला केलेल्या वन अधिकाऱ्यांना स्पष्ट वाटत नाहीत, त्यामुळे पोलिसांनाच त्याचा शोध लावावा लागणार आहे.

death
Goa Tourisam | गोव्याच्या पर्यटनाचा झंझावात! 2026 च्या पहिल्या 3 महिन्यांत 28.5 लाख पर्यटकांची विक्रमी नोंद

उपवनसंरक्षक जे. के. वर्की यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांना पत्र पाठवून बेतोडा येथे गावडे याच्या झालेल्या मृत्यूची पोलिस चौकशी करावी, अशी विनंती केली आहे. घटनास्थळी गव्याच्या हालचाली दर्शवणारे खुरखुणांचे ठसे, शेण, केस किंवा इतर कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. शव चिकित्सा अहवालात नमूद केलेल्या जखमांची माहिती मिळतीजुळते नाहीत. शरीरावर शिंगाच्या खुणा किंवा हल्ला केलेल्या अनेक ठिकाणी जखमा आढळून येत नाहीत. हल्ला होताना कोणी पाहिलेले नाही.

शवचिकित्सा अहवालात विसंगती...

दरम्यान, गावडे यांचा मृतदेह वनक्षेत्रात आढळून आला होता. त्यामुळे त्याच्यावर गव्याने हल्ला केल्याचा निष्कर्ष तेथील ग्रामस्थांनी काढला होता. मात्र घटनास्थळाची पाहणी तसेच शवचिकित्सा अहवालात अनेक विसंगती दिसून आल्या आहेत. मृत्यूबाबत स्थानिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाली असून, गवा हल्ल्याच्या कथित घटनेत अनेक विसंगती असल्याचेही बोलले जात आहे. अधिकृत अहवालानंतरच नेमके वास्तव स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news