Ban on Bathing in Mhadei River | म्हादई नदीपात्रात आंघोळीवर बंदी

वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पंचायतीचा निर्णय; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार
Ban on Bathing in Mhadei River
Ban on Bathing in Mhadei River Pudhari photo
Published on
Updated on

वाळपई : नगरगाव पंचायत क्षेत्रातील म्हादई नदी पात्र अनेक ठिकाणी आंघोळीसाठी धोकादायक असल्याने त्या भागांमध्ये नागरिकांना आंघोळ करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नगरगाव ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला असून, सत्तरी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत कुर्टीकर यांच्या निर्देशानुसार विविध ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. नदीत आंघोळ करण्याचा प्रयल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.

गेल्या दोन महिन्यांत सत्तरी तालुक्यातील विविध नदीपात्रांमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये वितेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषता नगरगाव पंचायत क्षेत्रातील काही ठिकाणी तरुणांकडून पाटर्श आयोजित केल्या जात असून, मद्यप्राशन करून चिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, गावाची बदनामी होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Ban on Bathing in Mhadei River
ED Raids at Six Locations in Goa| गोव्यात ईडीचे सहा ठिकाणी छापे

स्थानिकांच्या मते, म्हादई नदी पात्र अनेक ठिकाणी अत्यंत खोल आणि धोकादायक आहे. पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज येत नसल्याने पोहता न येणाऱ्या व्यक्तीना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे नदीपात्रात आंघोळीवर बंदी घालावी, अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे केली होती. त्यानुसार आता प्रशासनाने हा निर्णय घेतला असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध बंधाऱ्यांमधील पाणीसाठादेखील बोकादायक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे यापूर्वी अनेकजण बुडाल्याच्या घटना घाइल्या आहेत. त्यामुळे बंधाऱ्यांमध्ये आंघोळ करण्यास जाऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

Ban on Bathing in Mhadei River
Goa |'त्या' वाघाची शिकार, हत्या नाही- वनमंत्री विश्वजित राणे

नदीपात्र धोकादायक असल्याने दुर्दैवी घटना टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी यांनी दिले असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

- देवयानी गावकर, सरपंच

विविध ठिकाणी सूचना फलक

दरम्यान, वाळपई येथे या विषयावर आयोजित आपत्कालीन व्यवस्थापन बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत लक्ष्मीकांत कुर्डीकर यांनी ग्रामपंचायतींना आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विविध ठिकाणी सूचना फलक उभारण्यात आले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news