Panaji Election Results 2026 | पर्रीकरांच्या बालेकिल्ल्यात बाबूश मोन्सेरात 'किंगमेकर', उत्पल यांच्या पॅनलचा दारुण पराभव

Panaji Election Results 2026: 27 विरुद्ध 3 निकाल सुरेंद्र फुर्तादो यांचा पराभव
Panaji Election Results 2026
Panaji Election Results 2026
Published on
Updated on

पणजी: पुढारी वृत्तसेवा

गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील एकमेव पणजी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान महसूल मंत्री व पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलने माजी संरक्षण मंत्री व माजी मुख्यमंत्री उत्पल पर्रीकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत 27 विरुद्ध 3 असा दणदणीत विजय मिळवला. यावरून पणजी विधानसभा क्षेत्र आणि ताळगाव विधानसभा क्षेत्र हे बाबूश मोन्सेरात यांचेच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Panaji Election Results 2026
Goa Gas Shortage 2026 | हॉटेल, रेस्टॉरंटवर दिसू लागले परिणाम

पणजी महापालिकेच्या 30 प्रभागासाठी 11 रोजी मतदान झाले होते आज शुक्रवारी दिनांक 13 रोजी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम बांबोळी येथे मतमोजणी झाली. पहिल्या सत्रामध्ये ताळगाव विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या आठ प्रभागांची मतमोजणी झाली त्यामध्ये सात विरुद्ध एक असा निकाल हाती लागल्यानंतर पणजी विधानसभा क्षेत्रातील प्रभागांची जसजशी मतमोजणी झाली तस तसे निकाल हाती येऊ लागले.

महत्त्वाचे म्हणजे गेली 35 वर्षे पणजी महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येणारे सुरेंद्र फुर्तादो हे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाग 9 मधून पराभूत झाले‌. तर त्यांचे पुत्र लेवोनीद फुर्तादो हे प्रभाग 7 मधून पहिल्यांदाच निवडून आले आहेत . भाजपच्या माजी महिला मोर्चाच्या प्रमुख ज्या पर्रीकर यांच्या पॅनल कडून उभ्या होत्या त्या डॉक्टर शितल दत्तप्रसाद नाईक यांचाही प्रभाग सहा मध्ये पराभव झाला आहे.

Panaji Election Results 2026
Colva Beach Sewage Pollution 2026 | कोलवा समुद्रात थेट सांडपाणी

मंत्री बाबूश मोन्सेरात व भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेल्या प्रोग्रेसिव फ्रंट पणजी या पॅनलचे 27 उमेदवार निवडून आले तर उत्पल पर्रीकर , काँग्रेस ,आम आदमी पक्ष या पक्षानी पाठिंबा दिलेल्या आम्ही पणजीकर या पॅनलचे अवघे तीन उमेदवार निवडून आले.

2 मताने विजय

पणजी महापालिकेच्या प्रभाग 17 मध्ये जॅक सुखीजा या आम्ही पणजीकर पॅनलचे उमेदवार अवघ्या दोन मतानी निवडून आले . त्यांनी प्रोग्रेसीव्ह पणजी पॅनलचे उमेदवार विद्यमान नगरसेवक जॉर्ज डेनीस यांचा दोन मतानी पराभव केला.

बाबूश मोन्सेरात यांचे पुत्र विजयी

विद्यमान महापौर व मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे पुत्र रोहित मोन्सेरात हे प्रभाग ४ मधून निवडून आले. त्यांनी आम्ही पणजीकर पॅनलचे जॉन पो यांचा पराभव केला .

सुरेंद्र फुर्तादो पराभूत

पणजी महापालिकेवर सर्वात जास्त काळ निवडणूक येणारे ज्येष्ठ नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांचा या निवडणुकीत पराभव झाला. भाजप समर्थक प्रोग्रेसीव पॅनलचे उमेदवार बेंतो लोर्ना यांनी फुर्तादो यांचा प्रभाग 9 मध्ये पराभव केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news