Azad Maidan Protest 2026 | पणजीतील आझाद मैदानावर आंदोलकांना 'नो एन्ट्री' पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड आणि निषेध

Azad Maidan Protest 2026 |पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड : अखेर पालिका उद्यानात जाहीर सभा
Azad Maidan Protest 2026
Azad Maidan Protest 2026
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉँग्रेस जनता पार्टी (सीपी) ने रविवारी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र आंदोलनास परवानगी नाकारत पोलिसांनी आझाद मैदानावर प्रवेश करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. तर इतरांनाही मैदानात प्रवेश करण्यापासून रोखले. त्यामुळे अखेर आंदोलकांनी पणजीतील पालिका उद्यानात एकत्र येत मागणी लावून धरली व हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धारही जाहीर केला.

Azad Maidan Protest 2026
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

या आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नसल्याचे कारण देत आझाद मैदानावर बंदी केली. त्यासाठी चारही बाजूने कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणालाही मैदानात प्रवेश करता येत नव्हता. पोलिस बंदोबस्त असतानाही सीजेपीच्या अमरीन शेख आणि जॅक सुकिजा यांनी तिरंगा हातात घेत घोषणा देत मैदानात प्रवेश केला. मात्र, पोलिसांनी त्यांना तिथे म्हणे मांडण्यापासून रोखत ताब्यात घेत त्यांना पोलिस व्हॅनमध्ये घालून आंदोलनस्थळावरून दूर नेण्यात आले.

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यावर ठास

उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्या. (नि.) रिबेलो म्हणाले की, आझाद मैदानावर जाण्यापासून रोखून प्रशासनाने स्वातंत्र्य नाकारले आहे. त्यामुळे ज्या सरकारच्या आदेशाने ही वेळ आली आहे. त्यांना २०२७ च्या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघातून गायब केले पाहिजे. त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्यायासोबत भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी च्या आहे. त्यासोबतच दर दहा वर्षांनी सरकार बदलले गेले पाहिजे. आम्ही गोवा वाचवण्यासाठी आलो आहोत. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आले पाहिजे, असेही न्या. रिबेलो म्हणाले.

वाल्मिकी नाईक यांचा आंदोलनाला पाठिंबा

आम आदमी पार्टीचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी आज ज्ञानेश कुमार यांच्याविरोद्धातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. तसेच, अमरीन शेख आणि आम आदमी पार्टीचे नेते जॅक सुकिजा यांना ताब्यात घेऊन गोवा सरकारने केलेल्या दडपशाहीची कारवाई त्यांनी तीव्र निषेध केला. गोवेकरांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यापासून रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेचा त्यांनी निषेध केला.


मैदानाला छावणीचे स्वरूप

सीजेपीचे आंदोलन आझाद मैदानावर होऊ नये, यासाठी मैदानाच्या चारही बाजूने पोलिस तैनात करण्यात आले होते. तसेच पोलिस व्हॅन उभ्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत आंदोलकांची संख्या कमी असल्याने मैदानाला छावणीचे स्वरूप आलेले दिसत होते.
त्यांनी दरवाजा न उघडल्याने अखेर आंदोलकांनी आपला मोर्चा पालिका उद्यानाकडे वळवला. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पणजीबाहेरील पोलिस स्थानकात नेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रात्री उशिरापर्यंत मैदानाभोवती पोलिस बंदोबस्त होता.

Azad Maidan Protest 2026
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

बेकायदेशीर ताब्यात घेतलेल्यांची उच्च न्यायालयात आज सुनावणी

एसवायआर प्रक्रियेविरोधात केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीपीतर्फे रविवारी आयोजित केलेल्या आंदोलनास आझाद मैदानावर प्रवेश नाकारण्यात आल्यानंतरही प्रवेश केलेल्यांना पोलिसांनी बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा फाउंडेशनने सादर केलेल्या याचिकेवर रविवार असूनही न्यायालयाने संध्याकाळी तातडीने सुनावणी घेतली.

ताब्यात घेतलेल्यांची त्वरित सुटका करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी १२ रोजी दुपारी १२ वा. आहे. पणजी पोलिसांनी नगरसेवक जॅक सुकिजा, अमरीन शेख, आदित्य पुरूळकर, मिलिंद राणे, शामिनो फर्नांडिस, जेस्टीलन नोरोन्हा, भूपेश बिंदे यांना ताब्यात घेऊन त्यांना पेडणे पोलिस स्थानकात नेण्यात आले. पोलिसांच्या कारवाईची गोवा खंडपीठाने दखल घेऊन पणजी व पेडणे पोलिसांना ताब्यात घेण्यामागील कारणे, तसेच आझाद मैदान हे आंदोलन करण्यासाठी निश्चित जागा आहे तर परवानगी नाकारल्याचे उत्तर सरकारला देण्याचे निर्देश दिले आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news