

वास्को : येथील कॅनरा बँकेमध्ये एका अज्ञात व्यक्तीने सोमवारी (दि. 5) मध्यरात्री प्रवेश करून बँक लॉकर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बँक इनचार्ज मोहन यांनी वास्को पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. याप्रकरणी वास्को पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 5 रोजी मध्यरात्री पावणे दोनच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने बँकेच्या मागील बाजूस असलेल्या वॉशरूमच्या खिडकीचे लोखंडी गिल्स कापून बँकेच्या आत प्रवेश केला. त्यानंतर त्या व्यक्तीने बँक लॉकरचा लोखंडी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. तथापी ते साध्य झाले नाही. बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याने वास्को पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली. याप्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका पाटील तपास करीत आहेत.