Goa Crime News | एटीएम कार्डद्वारे फसवणूक; वास्कोत दोन तक्रारी दाखल

Goa Crime News
Goa Crime News | एटीएम कार्डद्वारे फसवणूक; वास्कोत दोन तक्रारी दाखलFile Photo
Published on
Updated on

वास्को : एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली येथील एका ज्येष्ठ नागरिकाची व एका युवकाची एका अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याच्या तक्रारी वास्को पोलिस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. सदर व्यक्तीने मेर्सीज वाडे येथील भास्कर (64वर्षे) यांच्या खात्यातून 57 हजार रुपये तर मेस्तवाडा येथील दुर्गाप्पा (30वर्षे) याच्या खात्यातून तीस हजार रुपये काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेर्सीजवाडे येथे राहणारे भास्कर हे 26 जून रोजी वास्कोतील बँकेतील एटीएममध्ये पैसे काढण्यास गेले होते. त्यावेळी एटीएममध्ये आलेल्या एका व्यक्तीने भास्कर यांना एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाणा केला. त्यानंतर त्या व्यक्तीने भास्कर यांच्याकडील एटीएम कार्ड अदलाबदल केली. ही अदलाबदल भास्कर यांच्या नजरेत आली नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने भास्कर यांच्या एटीएम कार्डचा वापर करताना एटीएममध्ये दोन व्यवहार करून 57 हजार रुपये काढले. या प्रकरणी वास्को पोलिसात तक्रार करण्यात आली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्लेटो कार्व्हालो तपास करीत आहेत.

अन्य एका घटनेत दर्गाप्पा हा युवक 26 जूनला एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. यावेळी त्या एटीएममध्ये आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याला पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला. असे करताना त्यांनी दुर्गाप्पाच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्या व्यक्तीने नंतर दुर्गाप्पा याच्या एमटीएम कार्डचा तीनवेळा वापर करून प्रत्येकी दहा हजार असे तीस हजार रुपये एटीएममधून काढले. या प्रकरणी उपनिरीक्षक प्लेटो कार्व्हालो तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news