

रंगयात्रा : निवृत्ती शिरोडकर
आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा, सहकाऱ्यांची साथ आणि प्रत्येक भूमिकाला न्याय देण्याची जिद्द यांच्या बळावर अश्मी गवस यांनी रंगभूमीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. गंभीर, भाविक, विनोदी भूमिकांपासून खलनायकेपर्यंत विविध व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी अभिनयाचे वेगवेगळे पलू अनुभवले. 'पूर्णविराम' या नाटकातील अनिताच्या भूमिकेसाठी त्यांना अखिल गोवा स्तरावरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
त्यांचा नाट्यप्रवास हा केवळ अभिनयापुरता मर्यादित नसून, प्रत्येक पात्रातून मानुषीचे नवे पलू समजून घेण्याचा प्रवास आहे. ६ नोव्हेंबर १९९९ रोजी वाळपई येथे जन्मलेल्या अश्मी यांच्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा ही सर्वात मोठी ताकद आहे. वेगवेगळ्या भूमिका निर्णयपणे साकारताना मुलीस पाहून आई-वडिलांना अभिमान वाटतो.
अश्मी आणि त्यांची बहीण दोन्हीही अभिनय करतात. त्यामुळे कुटुंबाचा आनंद आणखी वाढतो. रंगभूमीवरील कामाच्या अनियमित वेळा, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या तालमी आणि प्रयोगांसाठी करावा लागणारा प्रवास यांमध्ये घरचासुद्धा विश्वास महत्त्वाचा ठरतो. त्याचबरोबर नाट्यसंघातला सहकाऱ्यांचा आणि संपूर्ण टीमचे सहकार्यही त्यांच्या प्रवासाला बळ देते. सुरक्षित आणि सहकार्युपूर्ण वातावरणामुळे प्रयोगासाठी किंवा प्रवासाला जाताना असुरक्षित वाटले नसल्याचे त्या सांगतात.
आजवर अश्मी यांनी जवळपास १७ नाटकांमध्ये ११ हून अधिक भूमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये तीन व्यावसायिक नाटकांचा समावेश असून, या नाटकांचे संपूर्ण गोव्यात २५ हून अधिक प्रयोग झाले आहेत. प्रत्येक प्रयोगातून नवा अनुभव मिळाला आणि अभिनयातील वेगवेगळ्या बाजू शिकता आल्या.
मुलगी, आई, बहीण, संत आणि खलनायिका अशा परस्परविरोधी छाटांच्या व्यक्तिरेखा साकारताना मानवी भावनाभावा, नातेसंबंध आणि संघर्ष समजून घेण्याची दृष्टी विकसित झाल्याचे त्या सांगतात. अश्मी यांच्या रंगप्रवासातील विशेष महत्त्वाची भूमिका म्हणजे 'पूर्णविराम' या नाटकातील अनिता. या नाटकाचे दिग्दर्शन विनय विष्णू गावस यांनी केले असून, लेखन इरफान मुजावर यांचे आणी अनुवाद गौतम वसंत गावस यांचा आहे.
अनिताच्या पात्रात इतके काही आहे की ते शब्दांत पूर्णपणे व्यक्त करणे कठीण आहे. ती भूमिका करताना मी स्वतःला पूर्णपणे त्या व्यक्तिरेखेत झोकून दिले, असे त्या सांगतात. त्यांच्या या मेहनतीला अखिल गोवा स्तरावरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराची पावती मिळाली.
अखिल गोवा नाट्यस्पर्धेतले कोकणी नाटकाने अश्मी यांच्यासमोर अभिनयाची मोठी कसोटी उभी केली.
गोव्यातील खाण व्यवसाय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वास्तविकार आधारित या नाटकात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. गंभीर आणि आव्हानात्मक पात्रासाठी अभिनयासोबतच भाषेवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक होते. दिग्दर्शक विनय विष्णू गावस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भाषेपासून व्यक्तिरेखेच्या भावविश्वापर्यंत प्रत्येक बाबीवर मेहनत घेतली.
जवळपास तीस कलाकारांचा सहभाग असलेल्या या नाटकातील सर्व कलाकार एकाच गावातील होते. त्यामुळे ही कलाकृती स्पर्धांपुरती मर्यादित न राहता गावाच्या सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक ठरली. मात्र, या नाटकाची सर्वात खास आठवण म्हणजे अश्मी यांच्या वडिलांनीच नाटकात त्यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
रंगमंचावर वडिलांसमोर पात्र म्हणून उभे राहणे, त्यांच्यासोबत संवाद साधणे आणि भाविनक प्रसंगताना त्यांना घट्ट मिठी मारणे हा क्षण त्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला. कदाचित आयुष्यात पहिल्याच dach मी बाबांना इतक्या घट्ट मिठी मारली होती, असे त्या सांगतात. त्याक्षणी अभिनय आणि वास्तव यातील सीमारेषा जणू विरघळून गेली होती.
'सूर्य सावत' या नाटकात अश्मी आणि त्यांची बहीण दोन्हीही अभिनय करत होत्या. अश्मी यांनी बहिणीच्या नंदेची भूमिका साकारली होती. नाटकातील बहिणीच्या मृत्यूचा प्रसंग इतka प्रभावी ठरला की प्रेक्षक भावुक झाले. कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू तरळले, तर रंगमंचावर आणि पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांना भावना आवरता आल्या नाहीत. नाटक आणि वास्तव यातील अंतर काही क्षानांसाठी नाहीसे झाल्याचा अनुभव त्यांच्या स्मरणार्थ राहिला आहे.
पुन्हा रंगभूमीवर परतण्याची ओढ
जवळपास दोन वर्षांपूर्वी अश्मी यांनी रंगभूमीपासून काहीकाळ विश्रांती घेतली होती. अभिनयाव्यतिरिक्त आपण आणखी काय करू शकतो आणि कला-सांस्कृतिक क्षेत्राला आपले योगदान कसे देता येईल, याचा विचार करण्यासाठी हा काळ उपयुक्त ठरला. स्वतःकडे आणि आपल्या कडेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर त्यांची रंगभूमीवर परतण्याची ओढ अधिक तीव्र झाली.
१५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता फोंडा येथील राजिव कला मंदिरात 'पूर्णविराम'मधील अनिताच्या भूमिकेतून त्या पुनरागमन करीत आहेत. भविष्यात दिग्दर्शन करण्याची आणि नवोदित कलाकारांना प्रशिक्षण देण्याचीही त्यांची इच्छा आहे. नृत्यदिग्दर्शनाच्या माध्यमातून कथा, भावना आणि विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा अनुभव त्यांना आहे. हा अनुभव दिग्दर्शनासाठी उपयुक्त ठरेल, असा त्यांचा विश्वास आहे.