

पणजी : गोव्यात वाढत्या महागाईविरोधात आम आदमी पक्षाने (आप) २६ नोव्हेंबर ते १९ डिसेंबरपर्यंत राज्यव्यापी ‘महागाई मुक्ती यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. या यात्रेला पक्षाचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. गोव्यातील वाढत्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि महागाईचा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचविण्यावर या यात्रेतून भर दिला जाणार आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, गोव्यात सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागाईचा मोठा फटका बसत आहे. सकाळच्या पावापासून ते प्रवासाच्या पेट्रोलचे भाव वाढले आहेत. घरगुती खर्च वाढल्याने नागरिकांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पक्षाकडून राज्यव्यापी यात्रा केली आहे. यात्रेदरम्यान पक्षाचे नेते सामान्य लोकांशी संवाद साधतील.
२६ नोव्हेंबर, पक्षाच्या संविधान दिनी या यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर गोव्यातील विविध भागांतून ही यात्रा नेण्यात येणार असून, महागाई आणि वाढत्या किमतींबाबत जनजागृती केली जाणार आहे. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावरही भर दिला जाणार असल्याचे पक्षाने केजरीवाल यांनी स्पष्ट केले. ही यात्रा १९ डिसेंबर, गोवा मुक्तिदिनी समाप्त होणार आहे.
गोवेकरांना भाजप, काँग्रेस नको
आपण अनेकवेळा गोव्यात येऊन लोकांशी संपर्क साधलेला आहे. गोव्यातील नागरिकांना भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष नको आहेत. काँग्रेसचे आमदार वारंवार फुटतात व भाजपचे सरकार बनते. भाजपचे सरकार रोखण्यासाठी आम्ही काँग्रेस सोबत युती करत नाही. मात्र काँग्रेस व भाजप वगळता इतर पक्षाशी युतीसाठी आम्ही तयार आहोत, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले.