

म्हापसा : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी सोमवारी म्हापसा सबयार्ड मध्ये छापा टाकून कृत्रिमरीत्या पिकवण्यात येणारे आंबे जप्त केले.
म्हापसा सबयार्ड मध्ये काही विक्रेते मोठ्या प्रमाणात आंबे कृत्रिम रित्या पिकवून जनतेच्या आयुष्याशी खेळत आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी सबयार्ड मधील आंबे विक्रेत्यांच्या गोदामावर छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी इथलीन सारख्या केमिकलची पाकिटे आढळली, जी आंब्यांमध्ये टाकून निर्माण होणार्या गॅसद्वारे आंबे पिकवले जातात. या केमिकलच्या माध्यमातून आंबा 24 तासांत पिकून तयार होतो अशी माहिती त्यांना व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी दिली.
या ठिकाणी मिळालेली पाकिटे इथलीन केमिकलची की दुसर्या अन्य केमिकलची हे लॅब मध्ये तपासून पहावे लागेल असे अधिकार्यांनी सांगितले. या यार्ड मध्ये व्यावसायिकांना एखादी गॅस चेंबर उपलब्ध करून द्यावी असे आपण सुचवले होते. परंतु त्यांना तशी सोय उपलब्ध न झाल्यामुळे हे व्यावसायिक कृत्रिमरीत्या आंबे खुले पिकवतात असे या अधिकार्यांनी सांगितले.