Arla Lake pollution Goa | अर्ला तलावाच्या प्रदूषणामुळे शेती धोक्यात; प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले पाण्याचे नमुने

अर्ला तलावाच्या प्रदूषणामुळे शेती धोक्यात; प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले पाण्याचे नमुने
water testing
water testingfile photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

फोंडा तालुक्यातील केरी येथील कर्माळे परिसरातील अर्ला तलावाच्या पृष्ठभागावर जाड, गडद आणि तेलकट थर आढळल्याच्या तक्रारीनंतर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (जीएसपीसीबी) तलावाची पाहणी केली. तसेच, तपासणीसाठी पाण्याचे नमुने गोळा केले आहेत.

मंडळाकडे ३ नोव्हेंबर रोजी सादर केलेल्या तक्रारीत स्थानिकांनी तलावाच्या पाण्यात गंजलेल्या रंगाचा गाळ आणि प्लास्टिक कचरा आढळत असल्याचे नमूद केले होते. तसेच, तलावात सांडपाणी सोडले जात असल्याचा संशयही व्यक्त केला होता. गावकऱ्यांनी पंचायत सदस्यांसह तलावात सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रदूषणाचा स्रोत शोधून काढावा आणि या पाणथळ क्षेत्राचे पुढील नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तलावातील पाण्यावर परिसरातील भातशेती, सुपारी, नारळ, काजू आणि अन्य पिकांची लागवड अवलंबून आहे. मात्र, तलावाचे पाणी प्रदूषित झाल्याने शेती आणि बागायती पिके धोक्यात आली आहेत. सुमारे १५० ते २०० शेतकरी कुटुंबे शेती आणि बागायतीसाठी तलावासह परिसरातील अन्य जलस्रोतांवर अवलंबून आहेत.

water testing
Bicholim Cleanest City Goa | साखळी नगरपालिकेने पटकावला गोवा राज्यातील 'प्रथम स्वच्छ शहर'चा बहुमान; राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान

या प्रदूषणामुळे पाण्याच्या पारंपरिक वापरावर परिणाम झाला असून, गावकरी तलावाच्या पाण्याच्या संपर्कात येण्यासही घाबरत आहेत. काही झाडे आणि वनस्पती सुकू लागल्याचे स्थानिक रहिवासी सचिन केरकर यांनी सांगितले. हा तलाव पिढ्यानपिढ्या गावासाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत राहिला आहे.

water testing
Goa Police Cyber Vigil 2.0 arrests | गोवा पोलिसांकडून सायबर गुन्हेगारीचा पर्दाफाश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.