Goa Court | अटकपूर्व जामीन फेटाळल्याने राजेश सावईकरची अटक अटळ

Goa Court | राजेश सावईकर याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला तर त्याची पत्नी रोशनी सावईकर हिला अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने मंजूर केला.
Court
CourtFile Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सुकूर - पर्वरी येथील कोमुनिदादच्या दोन भूखंडावर कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे मालकी व ताबाचा दावा केल्याच्या प्रकरणातील विद्यमान पंचसदस्य तथा संशयित राजेश सावईकर याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला तर त्याची पत्नी रोशनी सावईकर हिला अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने मंजूर केला.

Court
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

पोलिसांनी सादर केलेल्या माहितीमध्ये संशयित राजेश सावईकर याच्याविरुद्ध प्रथमदर्शनी अनेक पुरावे समोर आले आहेत. पंचायत सरपंच असताना त्याने पदाचा गैरवापर करत हे भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यावर मालकी ताबा मिळवल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत दिसून येत आहे.

त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचा पोलिसांनी केलेला दावा सत्र न्यायालयाने उचलून धरत अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. त्याची पत्नी रोशनी सावईकरहिच्याविरुद्ध भक्कम पुराव्यांचा अभाव असल्याने तिला अटकपूर्व जामीन दिला आहे.

Court
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

सेरुला भूखंड घोटाळा

सेरुला कोमुनिदादचे अॅटर्नी पीटर मार्टिन्स यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सावईकर दांपत्यासह अन्य व्यक्तींनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्याद्वारे सुकुर येथील दोन कोमुनिदाद भूखंडावर बेकायदेशीरपणे मालकी व ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता त्याच्या अनुषंगाने पर्वरी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करणे, कोमुनिदादाच्या जमिनीचे कथित फसवे हस्तांतरण आणि त्याआधारे मालकी हक्काचा दावा केल्याचे आरोप सावईकर दांपत्यावर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, या कथित जमीन गैरव्यवहाराची निष्पक्ष आणि व्यापक चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणीही पुढे आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.