Akanksha Naik Theatre Artist | रंगभूमीशी नाळ जपणारी तरुण अभिनेत्री आकांक्षा नाईक यांच्या प्रेरणादायी कलाप्रवासाची यशोगाथा

Akanksha Naik Theatre Artist | रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसते; ती माणसाच्या भावना, संघर्ष, स्वप्ने आणि सामाजिक वास्तव व्यक्त करणारे प्रभावी माध्यम असते.
Akanksha Naik Theatre Artist
Akanksha Naik Theatre Artist
Published on: 
Updated on: 

रंगभूमीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या तरुण कलाकारांमध्ये आकांक्षा नाईक हे नाव आश्वसकपणे पुढे येत आहे. मानसशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण, व्याख्याता आणि महाविद्यालयीन समुपदेशक म्हणून जबाबदारी, योगाचे प्रशिक्षण, लेखन आणि नृत्य्याची आवड अशा विविध पैलूंचे त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध झाले आहे.

Akanksha Naik Theatre Artist
Rahul Gandhi | गोवा बनले भ्रष्टाचाराचे मॉडल; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल

मात्र, या सगळ्यांत अभिनय ही त्यांच्यासाठी केवळ छंदाची बाब नसून स्वतःला व्यक्त करण्याचे आणि स्वतःची ओळख घडवण्याचे माध्यम आहे. नोकरी, कौटुंबिक जबाबदाऱ्या, प्रवास, सामाजिक अपेक्षा आणि रंगभूमीवरील प्रेम यांचा समतोल साधत त्यांनी आपला कलाप्रवास सुरू ठेवला आहे.

या वाटचालीत अडचणी आल्या, काही काळ नाटकापासून दूर राहावे लागले; तरीही अभिनयाची ओढ कमी झाली नाही. 'मी कलेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करेन; पण माझी कला मला कधीच सोडून जाणार नाही,' ही त्यांची भावना त्यांच्या कलाप्रेमाची साक्ष देते.

सतरीतला होंडा येथे जन्मलेल्या आकांक्षा नाईक यांचे बालपण साध्या कुटुंबात गेले. वडील अशोक नाईक, आई अनया नाईक, मोठी बहीण अक्षता आणि छोटा भाऊ ओमकार हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.

अभिनयाची आवड शालेय जीवनातच त्यांच्या मनात रुजली. चौथीित शिकत असताना त्यांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत वकिलाची भूमिका साकारली. या सादरीकरणासाठी बहिणीने त्यांना संवाद लिहून दिले होते. स्पर्धेत तिसरे पारितोषिक आणि छोटी ट्रॉफी मिळाली. आकाराने छोटी असलेली ही ट्रॉफी त्यांच्या अभिनयप्रवासातील पहिली आनंददायी आठवण ठरली.

Akanksha Naik Theatre Artist
Rahul Gandhi | गोवा बनले भ्रष्टाचाराचे मॉडल; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल

वडिलांच्या नाट्यप्रेमानेही त्यांच्या आवडीला बळ दिले. तरुणपणी गावातील नाटकात काम केलेल्या अशोक नाईक यांनी 'अमृत मोहिनी' या नाटकात भस्मासुराची भूमिका साकारली होती. वडिलांचा अभिनय पाहून आकांक्षांना रंगभूमीचे आकर्षण अधिक जाणवले. बालपणीचा अनुभव आणि वडिलांची प्रेरणा यातून अभिनयाची आवड अधिक दृढ झाली.

महाविद्यालयीन जीवनात आकांक्षांच्या अभिनयाला अधिक गंभीर वळण मिळाले. महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षात त्यांनी 'पश्चाताप' या एकांकिकेत ३० भूमिकेची साकारली. कला अकादमीच्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत या भूमिकेसाठी त्यांना अभिनयाचे प्रमाणपत्र मिळाले. या सन्मानामुळे अभिनयाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची प्रेरणा मिळाली.
त्यांनी अभिनयाचे औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नसले, तरी अनुभव, निरीक्षण आणि वरिष्ठ कलाकारांकडून शिकण्याच्या वृत्तीतून स्वतःची अभिनयशैली विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.

तिसरीत असताना कथक नृत्याचे प्रशिक्षण सुरू केले होते. प्रवेशिका प्रथमपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नववीत अभ्यासामुळे नृत्य थांबवावे लागले. मात्र, या प्रशिक्षणाUAGES नृत्य आणि अभिव्यक्ती याविषयीची जाणीव विकसित झाली. 'फोर इडियट्स'मधील पिया, 'जमले रे जमले'मधील वंदना अर्थात नर्स, 'भूप माझी मांगरांची'मधील निमा, 'काहीतरी होतंय मग'मधील रिकी आणि 'होमखण'मधील तुळशी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या आहेत.

प्रत्येक भूमिकेने त्यांना अभिनयातील नवे आव्हान दिले. डॉ. प्रकाश वडारिकर लिखित, कला आविष्कार मासोर्डे प्रस्तुत आणि विनय विष्णू गावस दिग्दर्शित 'होमखण'मधील तुळशी ही भूमिका त्यांच्या विशेष जवळची आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेत अन्याय सहन करणारी, सुरुवातीला दडपली गेलेली आणि पुढे स्वतःचा आवाज शोधून अन्यायाविरुद्ध उभी राहणारी तुळशी त्यांनी भावानले.

Akanksha Naik Theatre Artist
Goa Navdurga : गोवा नवदुर्गा दर्शन

स्त्रीचा स्वाभिमान, स्वतःचे अस्तित्व आणि हक्कासाठी लढण्याची ताकद या मुल्यांशी ही व्यक्तिरेखा जोडलेली आहे, त्यामुळे तुळशी साकारताना कलाकार म्हणून नव्हे, तर एक स्त्री म्हणून अनेक गोष्टींचा विचार करता आला. या भूमिकांसाठी त्यांना 'भांगराळे गोंय अस्मिताय' आयोजित कोंकणी नाट्यस्पर्धेत अभिनयाचे प्रमाणपत्र मिळाले.

कलाकाराच्या मेहनतीткеच त्याला आधार देणाऱ्या माणसांचे योगदान महत्त्वाचे असते. आकांक्षांच्या प्रवासात आई अनया नाईक यांचा आधार मोलाचा ठरला. नोकरी, प्रवास आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या तालमी यांदा वेळ घालताना घरातील जबाबदाऱ्या सांभाळणे कठीण होत असे. बायको श्रवणक्षमतेचा अभाव असलेले आणि त्यांना जे अपत्य झालं त्यातही श्रवणदोष होता. या परिस्थितीने त्यांच्या स्वप्नांना पूर्णविराम दिला नाही. आई-वडिलांनी दिलेली जिद्द आणि आत्मविश्वासाने त्यांनी प्रत्येक संकटावर मात केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news